नवी दिल्ली : पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाची थेट नाचक्की झाल्याचं समोर आलंय. तेही खोट्या आरोपांमुळे. त्यामुळे सध्या पाकिस्तान क्रिकेट संघ आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चर्चेचा विषय ठरला आहे. आशिया कपच्या अंतिम फेरीत श्रीलंकेकडून झालेल्या दारूण पराभवामुळे पाकिस्तानी संघ सर्वांच्या निशाण्यावर आहे. तर आता टी-20 (T-20) विश्वचषकासाठी संघ निवडीच्या मुद्द्यांमुळे पाकिस्तानी बोर्डाला टीकेला सामोरं जावं लागलंय. या सगळ्यामध्ये फास्ट बॉलर शाहीन शाह आफ्रिदीबाबत (Shaheen Afridi) एक असा खुलासा समोर आलाय की यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात पीसीबीविषयी चर्चा रंगली आहे. हे संपूर्ण काय प्रकरण आहे. ते आधी समजून घ्या…
आपल्या क्रिकेट संघाची एवढी मोठी ओळख आणि संघाच्या जीवावर बेतलेल्या दुखापतींबाबतच्या हलगर्जीपणामुळे पीसीबीला आधीच सर्वांकडून टीकेला सामोरं जावं लागतंय. आता पाकिस्तानचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू आणि शाहीन आफ्रिदीचा सासरा शाहिद आफ्रिदीनं लंडनमध्ये उपचार घेत असलेला शाहीन हा सर्व खर्च स्वतः उचलत असल्याचा स्फोटक खुलासा केला आहे. एका पाकिस्तानी वाहिनीशी बोलताना शाहिद असं म्हणालाय. त्यामुळे पीसीबीवर चांगलीच नामुष्की ओढावल आली.
Huge revelation by @SAfridiOfficial! @TheRealPCB must come up with a clarification#PAKvENG #ShaheenAfridi #CricketTwitter pic.twitter.com/6irvlWmsIS
— muzamilasif (@muzamilasif4) September 15, 2022
शाहिद आफ्रिदी म्हणाला की, मी शाहीनबद्दल बोललो तर त्याच्या जागी जो कोणी असेल. आता हा मुलगा (शाहीन) स्वतः इंग्लंडला गेला. इथून मी डॉक्टरांची व्यवस्था केली आणि तिथून तो डॉक्टरांशी बोलला. तो सर्व काही करत आहेत. पीसीबी यात काहीच करत नाही, असा आरोप शाहिदनं केलाय.
शाहीन शाह आफ्रिदीची गणना सध्या अव्वल गोलंदाजांमध्ये केली जाते. तो पाकिस्तानी गोलंदाजीचा कणा आहे. अशा परिस्थितीत त्याची टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघात निवड झाली आहे. याआधी आशिया चषकासाठीही तो पाकिस्तान संघाचा भाग होता. पण, जुलैमध्ये झालेल्या दुखापतीमुळे तो या स्पर्धेत खेळू शकला नव्हता.