अरे जेवण कधी येणार… सचिन-लारा वैतागले, कारण जाणून घ्या…

क्रिकेट जगतात सचिन तेंडुलकरच्या बहारदार कामगिरीची नेहमीच चर्चा असते. अताही त्याची एक पोस्ट चर्चेत आलीय.

अरे जेवण कधी येणार... सचिन-लारा वैतागले, कारण जाणून घ्या...
सचिन-लारा वैतागलेImage Credit source: social
Follow us
| Updated on: Sep 27, 2022 | 10:51 PM

नवी दिल्ली : क्रिकेट (Cricket) जगतात सचिन तेंडुलकरच्या दमदार कामगिरीची नेहमीच चर्चा असते. यंदाची त्याची अशीच चर्चा रंगली आहे. पण, ही चर्चा त्याच्या पोस्टमुळे आहे. इंडिया लिजेंड्सचा कर्णधार ब्रायन लारा (brian lara) आणि -दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं (sachin tendulkar) एक फोटो शेअर केलाय. यात तो वेस्ट इंडिजचा ब्रायन लारासोबत दिसत आहे. या फोटोमध्ये दोघेही डोंगराच्या मधोमध असलेल्या एका हॉटेलमध्ये जेवणासाठी एकत्र बसले आहेत आणि कॅप्शनवरून असं दिसतंय की, भुकेमुळे दोघांची अवस्था वाईट आहे. असं नेमकं काय झालं, याची का चर्चा रंगली, याविषयी अधिक जाणून घ्या….

सचिननं काय लिहिलंय?

सचिनने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ‘अरे जेवण कधी येणार? #Lunchtime #Road Safety World Series, असे हॅशटॅगही दिले आहेत. फोटोमध्ये सचिन आणि लारा ज्यूस पिताना दिसत आहेत. ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. नेटिझन्सनं देखील यावर वेगवेगळं बोललंय. आता सचिन तेंडुलकर म्हणजे चर्चा तर होणारच. पण, सचिनच्या या पोस्टची चांगलीच चर्चा रंगली आहे.

ही इन्स्टा पोस्ट पाहा

भारतीय संघ गतविजेता आहे. गेल्या वर्षी सचिनच्या नेतृत्वाखाली भारत लिजेंड्सनं श्रीलंकेच्या दिग्गजांना हरवून विजेतेपद पटकावले होते.

दोघेही दिग्गज आहेत

सचिननं आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 200 कसोटी सामन्यांमध्ये 15 हजार 921 धावा केल्या आहेत. आतापर्यंतच्या या सर्वाधिक धावा आहे. वनडेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही सचिनच्या नावावर आहे. त्यानं 463 एकदिवसीय सामन्यांमध्ये 18 हजार 426 धावा केल्या आहेत.

सचिननं 100 आंतरराष्ट्रीय शतकंही ठोकली. ही आतापर्यंतच्या कोणत्याही खेळाडूची सर्वाधिक आहे. त्याचवेळी लाराच्या नावावर 131 कसोटीत 11 हाजार 953 धावा आणि 299 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10 हजार 405 धावा आहेत. त्यानं दोन्ही फॉरमॅटमध्ये 53 शतकं झळकावलीयत.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.