Prithvi Shaw | पृथ्वी शॉ याचा धमाका सुरुच, इंग्लंडमध्ये आणखी एक विक्रम
Prithvi Shaw Record | पृथ्वी शॉ याने मोठा कारनामा केला आहे. पृथ्वीने झंझावात कायम ठेवत रेकॉर्ड केला आहे.
लंडन | पृथ्वी शॉ, टीम इंडियाचा युवा आणि सलामीवीर फलंदाज. पृथ्वी गेल्या वर्षापासून टीम इंडियातून बाहेर आहे. पृथ्वी शॉ टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी इंग्लंडमध्ये वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळतोय. पृथ्वी शॉ याने नॉर्थ्मपटशायरकडून इंग्लंडमध्ये वनडे कपमध्ये पदार्पण केलं. पृथ्वीचा वनडे कपमध्ये खेळण्याचा निर्णय हा गेमचेंजिग ठरला. महिन्याभरापूर्वी जो पृथ्वी टीकेचा धनी ठरला होता, त्याचंच आता दिग्गज क्रिकेटपटूंसह सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे.
पृथ्वी इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या वनडे कपमधील पदार्पणातील सामन्यात कमनशिबी ठरला. पृथ्वी पहिल्याच सामन्यात दुर्देवाने हिट विकेट झाला. त्यामुळे पृथ्वी आणखी ट्रोल झाला. मात्र त्यानंतर झोकात कमबॅक केलं. पृथ्वीने 9 ऑगस्ट रोजी खणखणीत द्विशतक ठोकलं. पृथ्वीने या द्विशतकासह क्रिकेट विश्वाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. पृथ्वीचं कौतुक सुरु झालं. पृथ्वीने यानंतर 4 दिवसांनी 13 ऑगस्टला शतकी खेळी केली.
पृथ्वीने समरसेट विरुद्ध 153 बॉलमध्ये 28 फोर आणि 11 खणखणीत सिक्सच्या मदतीने 244 धावांची ऐतिहासिक खेळी केली. तर डरहम विरुद्ध 76 बॉलमध्ये 15 फोर आणि 7 खणखणीत सिक्सच्या मदतीने नाबाद 125 धावा केल्या. पृथ्वीने 2 सामन्यात त्याच्या विरोधात असेलला सूर बदलून टाकला. पृथ्वीने द्विशतक आणि शतकी खेळीसह निवड समितीला सडेतोड उत्तर दिलं.
पृथ्वी शॉ याची आणखी एक विक्रमी कामगिरी
Prithvi Shaw passed 3️⃣0️⃣0️⃣0️⃣ career runs in List A cricket yesterday! 💪
It’s taken him just 57 matches. 🥵 pic.twitter.com/15x82hpLNW
— Northamptonshire CCC (@NorthantsCCC) August 14, 2023
आता पृथ्वीने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. पृथ्वीने लिस्ट ए क्रिकेटमध्ये कीर्तीमान केला आहे. पृथ्वीने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 3 हजार धावांचा टप्पा पार केला आहे.
पृथ्वी शॉ याची लिस्ट ए क्रिकेटमधील कामगिरी
पृथ्वीने आतापर्यंत एकूण 57 लिस्ट ए सामन्यांमध्ये 50.02 च्या सरासरीने आणि 82.97 या स्ट्राईक रेटने 3 हजार 56 धावा केल्या आहेत. पृथ्वीने या दरम्यान 12 शतकं आणि 16 अर्धशतकं ठोकली आहे. तसेच या दरम्यान पृथ्वीने 521 चौकार आणि 46 सिक्सही लगावले आहेत.