IPL 2022: पाचव्या विजयासह बंगळुरू दुसऱ्या, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत बटलरची आघाडी
पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राजस्थानकडे गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही मजबूत आहेत.
मुंबईः आयपीएल 2022 चा (IPL 2022) अर्धा हंगाम आता जवळपास संपला आहे. सर्व संघांनी एकूण 14 सामने खेळायचे आहेत आणि दिल्ली वगळता सर्व संघांनी किमान सहा सामने खेळले आहेत. त्यानंतर गुजरातचा संघ गुणतालिकेत (IPL Table Points) पहिल्या स्थानावर मात्र कायम आहे. बंगळुरूनेही गुजरातच्या बरोबरीने 10 गुण मिळवले आहेत, मात्र कमी धावसंख्येमुळे हा संघ दुसऱ्या स्थानावरच आहे. आतापर्यंत गुजरातचा संघ सर्वात बलाढ्य म्हणून पाहिला जात असला तरी हार्दिकच्या कर्णधारपदी असलेल्या संघाची फलंदाजी कमकुवत दिसत आहे, तर बंगळुरूची फलंदाजी मजबूत असली तरी गोलंदाजीत थोडीशी कमतरता दिसून येत आहे. पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राजस्थानकडे गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही मजबूत आहेत, पण या संघात अष्टपैलू खेळाडू नसल्याने पाँईंट टेबलमध्ये त्यांची काय परिस्थिती होते ते आता पाहावे लागेल.
रॉयल्सचा जोस बटलरच्या सर्वाधिक धावा
राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर (Jose Butler) सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर लोकेश राहुलचाही यंदा ऑरेंज कॅपच्या शर्यतीत समावेश झाला आहे. राहुलने 265 धावा केल्या असून बटलरनंतर सर्वाधिक धावा करणारा तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
- जोस बटलरने 6 सामन्यात 375 धावा काढून सगळ्यात जास्त स्कोर केला आहे तर
- त्यानंतर लोकेश राहुलने सात सामन्यात 265 धावा काढल्या आहेत.
- तर डुप्लेसिसने सात सामन्यातून 250 धावांचा काढून 96 स्कोअरवर तो आहे.
- श्रेयस आय्यरच्या सात सामन्यातून 236 धावा 85 स्कोअर आहे.
मुंबई आणि चेन्नईची कामगिरी सर्वात वाईट
या आयपीएलच्या हंगामात तर मुंबई आणि चेन्नईची कामगिरी सर्वात वाईट आहे. या दोन्ही संघांनी पाँईंट टेबलमध्ये दुसरे स्थान असून या दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी सगळेच सामाने सामने जिंकावे लागणार आहेत. आरसीबी आणि लखनऊ यांच्यातील सामन्यानंतर ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपची यादीही बदलली आहे. पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप शर्यतीत कोणते खेळाडू सामील आहेत आणि पॉइंट टेबलची स्थिती कशी आहे ते जाणून घेऊया.
टेबल पाँईट्सची स्थिती
सहा सामन्यांत पाच विजयांसह गुजरातचा संघ पाँईट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर कायम आहे. दुसरीकडे, बंगळुरूने सातपैकी पाच सामने जिंकून दुसरे स्थान कायम ठेवले आहे. राजस्थान तिसऱ्या तर लखनऊ चौथ्याल क्रमांकावर आहे. हैदराबादचा संघ मात्र पाचव्या स्थानावर आला आहे. चांगल्या सुरुवातीनंतर कोलकाताचा संघ रुळावरून घसरला असून सहाव्या स्थानावर आहे. तर पंजाब सातव्या तर दिल्ली आठव्या स्थानावर आहे. मुंबई आणि चेन्नई हे पाँईंट टेबलमध्ये शेवटचे दोन संघ आहेत. दोघांनी प्रत्येकी सहा सामने खेळले आहेत, पण चेन्नईचे दोन गुण आहेत, तर मुंबईचे खातेही उघडलेले नाही.
संबंधित बातम्या
IPL 2022 Points Table: एमएस धोनीचा एमआयला दे धक्का, मुंबईच्या खात्यात अजूनही फक्त ‘भोपळा’च
MI vs CSK IPL 2022: अरेरे, Rohit Sharma च्या नावावर IPL मधल्या सर्वात खराब रेकॉर्डची नोंद