U19 IND vs AUS Final | वर्ल्ड कप फायनलमध्ये खेडचा अंपायर, कोण आहे तो?

India vs Australia U19 World Cup Final | अंडर 19 वर्ल्ड कप 2024 महाअंतिम सामन्यात मुळ महाराष्ट्रातील खेडमधील असलेली व्यक्ती अंपायर आहे. जाणून घ्या तो नक्की कोण आहे?

U19 IND vs AUS Final | वर्ल्ड कप फायनलमध्ये खेडचा अंपायर, कोण आहे तो?
Follow us
| Updated on: Feb 11, 2024 | 3:13 PM

बेनोनी | अंडर 19 वर्ल्ड कप 2024 फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहे. हा सामना विलोमोरी पार्क बेनोनी येथे खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाला कमी धावांमध्ये रोखण्याचं आव्हान असणार आहे. या महाअंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या मराठमोळ्या माणासकडे मोठी जबाबदारी आहे. या सामन्यात अल्लाहुद्दीन पालेकर पंचाच्या भूमिकेत आहेत.

असा झाला खेड ते दक्षिण आफ्रिका प्रवास

अल्लाद्दीन पालेकर हे मुळचे महाराष्ट्रातील कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेडचे आहेत. पालेकर हे खेडमधील शिव या गावातील आहे. अल्लाउद्दीन पालेकर यांचे वडील हे नोकरीनिमित्ताने दक्षिण आफ्रिकेला गेले. त्यानंतर ते तिथेच स्थायिक झाले. अल्लाउद्दीन यांचा जन्म हा दक्षिण आफ्रिकेतील. मात्र त्यांची आपल्या गावासोबतची नाळ अजूनही कायम आहे.

इंडिया-दक्षिण आफ्रिका सामन्यातून पदार्पण

अल्लाउद्दीन पालेकर याने 2022 साली टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातून अंपायर म्हणून पदार्पण केलं. तेव्हापासून अल्लाउद्दीन खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले. अल्लाउद्दीन पालेकर हे क्रिकेट विश्वातील 497 आणि दक्षिण आफ्रिकेसाठी 57 वे अंपायर आहेत.

हे सुद्धा वाचा

अल्लाउद्दीन याने त्याआधी 2014-15 साली रणजी क्रिकेटमध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये अंपायरगिरी केली. तसेच अंपायर होण्याआधी अल्लाउद्दीन क्रिकेटर म्हणून खेळले आहेत. अल्लाउद्दीनने 2006 पर्यंत साऊथ आफ्रिकेतील टायटन्स टीमचंही प्रतिनिधित्व केलं आहे.

सामन्यात आतापर्यंत काय झालं?

दरम्यान ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात 23 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 100 धावा केल्या आहेत. राज लिंबानी याने सॅम कोन्स्टास याला झिरोवर आऊट करत ऑस्ट्रेलियाला 16 धावांवर पहिला धक्का दिला. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाने जोरदार बॅटिंग करत टीम इंडियावर दबाव तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र नमन तिवारी याने ऑस्ट्रेलियाला झटपट 2 झटके देत पुन्हा एकदा टीम इंडियाला कमबॅक करुन दिलं. नमन तिवारी याने कॅप्टन ह्यू वेबगेन याला 48 आणि हॅरी डिक्सन याला 42 धावांवर आऊट केलं.

ऑस्ट्रेलिया अंडर 19 प्लेईंग ईलेव्हन | ह्यू वेबगेन (कॅप्टन), हॅरी डिक्सन, सॅम कोन्स्टास, हरजस सिंग, रायन हिक्स (विकेटकीपर), ऑलिव्हर पीक, राफ मॅकमिलन, चार्ली अँडरसन, टॉम स्ट्रेकर, महली बियर्डमन आणि कॅलम विडलर

टीम इंडिया अंडर 19 प्लेईंग इलेव्हन | उदय सहारन (कर्णधार), आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी आणि सौम्य पांडे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.