हुकूमाचा एक्का गेला की मिळाला! आयपीएल स्पर्धेपूर्वी वेगवान गोलंदाजाने नाव मागे घेतल्याने कोलकात्याची डोकेदुखी
आयपीएल 2024 स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. पण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोघम तारीख ठरवली असून नियोजनाबाबत घोळ कायम आहे. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यावर लगेचच वेळापत्रक समोर येईल. तत्पूर्वी आयपीएल संघांमध्ये उलथापालथ सुरु आहे. कोलकाता नाइट रायडर्सने आता हुकूमाचा एक्का काढला आहे.
मुंबई : आयपीएल 2024 स्पर्धेच्या जेतेपदासाठी सर्वच 10 संघांनी मोर्चेबांधणी केली आहे. कोट्यवधी रुपयांची उधळण करत दिग्गज खेळाडूंना आपल्या चमूत घेतलं आहे. वेगवान गोलंदाजांसाठी तयार केलेल्या नव्या नियमामुळे भाव चांगलाच वधारला आहे. त्यात जखमी खेळाडू स्पर्धेतून माघार घेत असताना नव्या खेळाडूंची एन्ट्री होत आहे. कोलकाता नाईट रायडर्स श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाखाली मैदानात उतरणार आहे. स्पर्धेपूर्वी कोलकात्याने आपल्या संघात एक मोठा बदल केला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस एटकिंसन इंडियन प्रीमियर लीग खेळणार नाही. त्यामुळे त्याच्या जागी कोलकात्याने दुष्मंत चमीरा याला संधी दिली आहे. वेगवान गोलंदाजांना दोन बाउंसरची परवानगी असल्याने कोलकात्याने तात्काळ त्याची निवड केली आहे. दुष्मंता चमीरा आपल्या वेगवान गोलंदाजीत स्विंग आणि सीम मुव्हमेंटने फलंदाजांना चकवा देण्यात माहिर आहे. यापूर्वी त्याने तीन आयपीएल खेळला आहे. 2018 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून, 2021 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून आणि 2022 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळला होता. यात त्याने 12 सामने खेळले आणि 9 गडी बाद केले.
केकेआरने मिनी ऑक्शनमध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस एटकिंसनसाठी 1 कोटी रुपयांची बोली लावली होती. आता एटकिंसनने आपलं नाव मागे का घेतलं याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. गस एटकिंगसन यापूर्वी एकही आयपीएल सामना खेळलेला नाही. दुसरीकडे, दुष्मंता चमीरा श्रीलंकेचा स्टार गोलंदाज आहे. त्याने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 55 सामन्यात 55 गडी बाद केले आहे. पण केकेआर संघात आधीच विदेशी खेळाडूंचा भरणा आहे. त्यात चमीराला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणं कठीण दिसत आहे.
🚨 NEWS 🚨@KKRiders name Dushmantha Chameera as replacement for Gus Atkinson.
More details 🔽 #TATAIPLhttps://t.co/ioBPp22mGi
— IndianPremierLeague (@IPL) February 19, 2024
आयपीएल 2024 साठी कोलकात्याचा संपूर्ण संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंह, रहमानुल्लाह गुरबाज, जेसन रॉय, सुनील नरेन, सुयश शर्मा, अनुकूल रॉय, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, केएस भरत, चेतन सकारिया, मिशेल स्टार्क, अंगकृष रघुवंशी, रमनदीप सिंह, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, मुजीब उर रहमान, दुष्मंता चमीरा, साकिब हुसैन