PAK vs AFG Live Streaming | पाकिस्तान-अफगाणिस्तान रंगतदार सामना, लाईव्ह मॅच कुठे पाहता येणार?
Pakistan vs Afghanistan Live Streaming | पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांसाठी वर्ल्ड कपमधील पुढील प्रवासाच्या हिशोबाने हा सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे.
चेन्नई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 22 व्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने असणार आहे. या सामन्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. कारण हा सामना बरोबरीचा होणार आहे. हा सामना पैसावसूल होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये 4 सामने खेळले आहेत. पाकिस्तानने सलग 2 सामने जिंकून त्यानंतरचे 2 सामने गमावले आहेत.तर अफगाणिस्तानने पराभवाच्या हॅटट्रिकनंतर मोठा उलटफेर केलाय. अफगाणिस्तानने वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंडचा काटा काढलाय. त्यामुळे पाकिस्तानसमोर अफगाणिस्तानचं मजबूत आव्हान असणार आहे. हा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार हे जाणून घेऊयात.
पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामना केव्हा?
पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामना सोमवारी 23 ऑक्टोबरला होणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याचं आयोजन कुठे करण्यात आलं आहे?
पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. तर दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?
पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान मॅच टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरच्या विविध चॅनेलवर पाहता येईल.
पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान मॅच मोबाईलवर फ्रीमध्ये कुठे पाहायला मिळेल?
पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान मॅच मोबाईलवर फ्रीमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने
𝑰𝒕’𝒔 𝒂 𝑴𝒂𝒕𝒄𝒉 𝑫𝒂𝒚 𝑻𝒐𝒎𝒐𝒓𝒓𝒐𝒘! 🤩
🆚 @TheRealPCB 🇵🇰 📆 23rd October 🕐 1:00 PM (AFT) 🏟️ MA Chidambaram Stadium, Chepauk, Chennai#AfghanAtalan | #CWC23 | #AFGvPAK | #WarzaMaidanGata pic.twitter.com/1MY3oN4XQc
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) October 22, 2023
अफगाणिस्तान टीम | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्लाह गुरबाज, इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान आणि नवीन उल हक.
पाकिस्तान टीम | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान, फखर जमान, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम.