Video | शाहीन आफ्रिदी नाम सुनके फास्ट बोलर समझा क्या? स्पिनर(भी) हैं अपुन, जडेजा स्टाईल गोलंदाजी

सध्याच्या उदयोन्मुख वेगवान गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) याचं नाव या यादीत सर्वात वर आहे. हा पाकिस्तानी गोलंदाज त्याचा वेग आणि स्विंगसाठी प्रसिद्ध आहे. अनेक दिग्गजांनीही त्याच्या अचूकतेचे कौतुक केले आहे.

Video | शाहीन आफ्रिदी नाम सुनके फास्ट बोलर समझा क्या? स्पिनर(भी) हैं अपुन, जडेजा स्टाईल गोलंदाजी
Shaheen Afridi Image Credit source: File
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 8:05 PM

मुंबई : सध्याच्या उदयोन्मुख वेगवान गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) याचं नाव या यादीत सर्वात वर आहे. हा पाकिस्तानी गोलंदाज त्याचा वेग आणि स्विंगसाठी प्रसिद्ध आहे. अनेक दिग्गजांनीही त्याच्या अचूकतेचे कौतुक केले आहे. उत्तम जलदगती गोलंदाज असूनही हा गोलंदाज वेगवान गोलंदाजी सोडून फिरकी गोलंदाजी करु लागल्यावर काय होईल याची कल्पना करा. शाहीनला फिरकी गोलंदाजी करताना पाहण्याची कल्पनाही अनेक जण करु शकणार नाहीत. परंतु ही गोष्ट खरी आहे. तो नेट्समध्ये फिरकी गोलंदाजी (Spin bowling) करत असल्याचे नुकतेच पाहायला मिळाले. मात्र शाहीनने वेगवान गोलंदाजी सोडलेली नाही, त्याने फक्त नेट्समध्ये फिरकी गोलंदाजीचा प्रयत्न केला आहे आणि ते करत असताना असे लक्षात आले की, त्याची बोलिंग स्टाईल भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजासारखी (Ravindra Jadeja) आहे.

पाकिस्तान सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिला सामना रावळपिंडीत खेळला गेला जो अनिर्णित राहिला. दुसरा सामना कराचीत होणार आहे. या सामन्यापूर्वी शाहीनने फिरकी गोलंदाजीत हात आजमावला.

व्हिडीओ व्हायरल

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या सराव सत्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहीन फिरकी करताना दिसत आहे. तो आपल्या संघाच्या फलंदाजाकडे डाव्या हाताने फिरकी चेंडू फेकत आहे आणि त्याची ॲक्शन भारताचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजासारखी दिसते. अनेकांनी हा व्हिडीओ ट्विट करत शाहीनच्या फिरकी ॲक्शनची जडेजाशी तुलना केली आहे.

जाडेजा नंबर 1 ऑलराऊंडर

श्रीलंके विरुद्ध मोहालीमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात शानदार शतक आणि एकूण नऊ विकेट घेणाऱ्या रवींद्र जाडेजाने रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. आयसीसीच्या (ICC Ranking) ताज्या कसोटी ऑलराऊंडर खेळाडूंच्या यादीत रवींद्र जाडेजा पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. जाडेजाने वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला मागे टाकलं आहे. अश्विन तिसऱ्या स्थानावर आहे. जाडेजाच्या क्रमवारीत दोन स्थानांची सुधारणा झाली. मोहाली कसोटीत जाडेजाने पहिल्या डावात नाबाद 175 धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याने नऊ विकेटही घेतल्या होत्या. त्याला सामनावीराच्या पुरस्कारने गौरवण्यात आले.

इतर बातम्या

Kaun Pravin Tambe Trailer: मुंबईच्या टेनिस क्रिकेटचा ‘बादशाह’ ‘कौन प्रवीण तांबे’ चा ट्रेलर रिलीज, दोन मिनिटांचा VIDEO अंगावर काटा आणेल

IPL 2022: ‘या’ सीजनमध्ये जोफ्रा आर्चर मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार? प्रॅक्टिसचा VIDEO आला समोर

IPL 2022: पैसाच पैसा! यंदा नुसत्या स्पॉन्सरशिपमधून BCCI ची रग्गड कमाई; आकडा वाचून चमकतील डोळे

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.