PAK vs BAN: बांगलादेशच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? कॅप्टनने काय म्हटंल?

Pakistan vs Bangladesh 1st Test : बांगलादेशला पाकिस्तानवर कसोटी क्रिकेटमध्ये विजय मिळवण्यासाठी तब्बल 13 सामन्यांची प्रतिक्षा करावी लागली. बांगलादेशच्या ऐतिहासिक विजयानंतर कॅप्टन नजमुल हुसैन शांतो याने काय म्हटलं?

PAK vs BAN: बांगलादेशच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? कॅप्टनने काय म्हटंल?
Najmul Hossain Shanto
Follow us
| Updated on: Aug 26, 2024 | 12:07 AM

बांगलादेश क्रिकेट टीमने 25 ऑगस्ट 2024 रोजी इतिहास रचला. बांगलादेशने पाकिस्तानला त्यांच्याच घरात तब्बल 10 विकेट्सने पराभूत केलं. बांगलादेशचा हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पाकिस्तान विरुद्धचा पहिला विजय ठरला. बांगलादेशच्या या विजयावर कॅप्टन नजमूल हुसैन शांतो याने आनंद व्यक्त केला. तसेच हा विजय देशासाठी फार महत्त्वाचा असल्याचं त्याने म्हटलं. बांगलादेशसाठी गेली काही महिने हे आव्हानात्मक होती. मात्र या विजयामुळे देशवासी आनंदी झाल्याचं शांतोने म्हटलं. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शांतोने माध्यमांशी संवाद साधला.

“पाकिस्तान विरूद्धच्या 10 विकेट्सने मिळवलेल्या विजयामुळे टीममध्ये उत्साह संचारला आहे. बांगलादेशसाठी हा विजय यासाठीही खास आहे, कारण आम्ही अनेक अडचणींचा सामना करतो होतो. टीमने कठोर परिश्रम आणि समर्थनाच्या जोरावर विजय मिळवला. आम्हाला या विजयाची आशा होती, कारण आम्ही अवघड खेळपट्टी आणि उष्ण हवामान अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात केली”, असं शांतोने म्हटलं.

गोलंदाजांचं कौतुक

कॅप्टन शांतोने स्पिनर आणि वेगवान गोलंदाजांचं तोंडभरून कौतुक केलं. “शाकिब अल हसन आणि मिराज या दोघांनी खेळपट्टीनुसार शानदार बॉलिंग केली, ज्यामुळे पाकिस्तान बॅक फुटवर गेली”, असं शांतोने म्हटलं. तसेच 90 धावांच्या आघाडीसह शेवटच्या दिवशी आपली बाजू भक्कम असेल, असा विश्वासही असल्याचं शांतोने नमूद केलं.

“आम्ही या विजयामुळे आनंदी आहोत. मात्र इथे थांबणार नाही. पुढील सामन्यातही चांगली कामगिरी करुन देशवासियांना अधिक आनंद देण्याचा प्रयत्न असणार आहे. बांगलादेशने या विजयासह क्रिकेट इतिहासात नवा अध्याय जोडला आहे. बांगलादेशच्या क्रिकेट चाहत्यांसाठी हा विजय अविस्मरणीय असा आहे”, असंही शांतोने सांगितलं.

कॅप्टन शांतोची प्रतिक्रिया

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, सॅम अयुब, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, खुर्रम शहजाद आणि मोहम्मद अली.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद आणि नाहिद राणा.

अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी.
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार.
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी.
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी.
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार.
काय सांगताय, केळीच्या खोडाच्या पावडरपासून बाप्पाची मूर्ती, बघा व्हिडीओ
काय सांगताय, केळीच्या खोडाच्या पावडरपासून बाप्पाची मूर्ती, बघा व्हिडीओ.
एसटी कर्मचाऱ्यांना सरकारनं फसवलं; पगारवाढ 2020 पासून नाहीच, तर…
एसटी कर्मचाऱ्यांना सरकारनं फसवलं; पगारवाढ 2020 पासून नाहीच, तर….
'हे मान्य नाही', शिवसेनेकडून मुंबईत बुरखा वाटपावर भाजपचा आक्षेप
'हे मान्य नाही', शिवसेनेकडून मुंबईत बुरखा वाटपावर भाजपचा आक्षेप.
भाग्यश्री आत्रामांचा आपल्या वडिलांनाच थेट इशारा, ‘…तर हात कापून टाकेन
भाग्यश्री आत्रामांचा आपल्या वडिलांनाच थेट इशारा, ‘…तर हात कापून टाकेन.
राणेचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, विरोधकांकडून टीका तर महायुतीची नाराजी
राणेचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, विरोधकांकडून टीका तर महायुतीची नाराजी.