PAK vs BAN: बाबर आझम रेकॉर्डच्या उंबरठ्यावर, बांगलादेश विरुद्ध करणार का?
Babar Azam PAK vs BAN: पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेलेा 21 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. बाबर आझमला या मालिकेत मोठा रेकॉर्ड करण्याची संधी आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे. बांगलादेश क्रिकेट टीम पाकिस्तान दौऱ्यावर आहे. बांगलादेश पाकिस्तान विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेला 21 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पाकिस्तानने या पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनची घोषणा ही सामन्याच्या काही तासांआधीच केली आहे. बाबरच्या कामगिरीकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. बाबरने या सामन्यात धमाकेदार बॅटिंग केल्यास त्याच्या नावावर काही रेकॉड्स होण्याची संधी आहे.
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 21 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. शान मसूद याची पाकिस्तानच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बाबर आझम याने 52 कसोटी सामन्यांमधील 94 डावात 45.85 च्या सरासरीने 3 हजार 898 धावा केल्या आहेत. बाबरला पहिल्या सामन्यात कसोटी क्रिकेटमध्ये 4 हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्याची संधी आहे. बाबरला 4 हजार धावांसाठी 102 धावांची गरज आहे. पाकिस्तानसाठी आतापर्यंत 11 फलंदाजांनी 4 हजार धावा केल्या आहेत. बाबरला 4 हजार धावा करण्यासह दोघांना मागे टाकण्याची संधी आहे.
बाबरकडे माजिद खान आणि हनीफ मोहम्मद या दोघांना पछाडण्याची संधी आहे. माजिद खान-हनीफ मोहम्मद या दोघांनी अनुक्रमे 3931 आणि 3915 अशा धावा केल्या आहेत. तसेच माजी सलामीवीर सईद अनवरच्या नावे 4 हजार 52 धावा आहेत. त्यामुळे बाबरकडे सईद अनवरलाही मागे टाकण्याची संधी आहे.
पाकिस्तान-बांगलादेश कसोटी मालिकेसाठी सज्ज
Trophy with a view 🏆💫
🇵🇰 and 🇧🇩 Test captains at Daman-e-Koh, Islamabad ©️
The Bank Alfalah Presents Blue World City Pakistan vs Bangladesh Test Series 2024 starts tomorrow 🏏#PAKvBAN | #TestOnHai pic.twitter.com/Pa2ZRiEDa9
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 20, 2024
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कॅप्टन), सौद शकील (उपकर्णधार) अब्दुल्लाह शफीक, सॅम अय्युब, बाबर आझम, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सलमान अली आघा, शाहीन शाह अफ्रिदी, नसीम शाह, खुर्रम शहझाद आणि मोहम्मद अली.
कसोटी मालिकेसाठी बांगलादेश टीम: नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटॉन कुमार दास, मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा, शरीफुल इस्लाम, हसन महमूद, तस्कीन अहमद आणि सय्यद खालेद अहमद.