PAK vs BAN: पाकिस्तानच्या त्या एका निर्णयाची सर्वत्रच चर्चा, 28 वर्षांनी पुन्हा असं घडलं
PAK vs BAN 1st Test: बांगलादेश क्रिकेट टीम कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर आहे. उभयसंघात एकूण 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. त्याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या निर्णयाची एकच चर्चा पाहायला मिळत आहे.
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात 21 ऑगस्टपासून 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा रावळपिंडी येथे आयोजित करण्यात आला आहे. पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोमवारी 19 ऑगस्ट रोजी प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली आहे. पीसीबीने एक आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. पीसीबीने प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकाही स्पिनरचा समावेश केलेला नाही. पाकिस्तानची यासह ही तब्बल 28 वर्षांनंतर पहिल्यांदा मायदेशात कसोटी सामना स्पिनरशिवाय खेळण्याची ही पहिली वेळ ठरेल.
अब्दुल्लाह शफीक आणि सॅम अय्युब हे दोघे पाकिस्तानसाठी ओपनिंग करतील. कॅप्टन शान मसूद तिसऱ्या स्थानी बॅटिंगसाठी येईल. माजी कर्णधार बाबर आझम हा चौथ्या स्थानी खेळेल. उपकर्णधार सऊद शकील पाचव्या स्थानी बॅटिंग करेल. त्यानंतर विकेटकीपर बॅट्समन मोहम्मद रिझवान आणि स्पिन ऑलराउंडर सलमान अली आगा यांच्यावर पुढील जबाबदारी असणार आहे.
4 वेगवान गोलंदाज, स्पिनरला संधी नाही
बांगलादेश विरूद्धच्या या पहिल्या कसोटी सामन्यात कॅप्टन शान मसूद 4 वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरणार आहे. टीममध्ये कोणताही स्पेशालिस्ट स्पिनर नाही. नसीम शाह, खुर्रम शहजाद, मोहम्मद अली आणि शाहीन शाह अफ्रिदी या चौकडीवर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे.
कसोटी मालिकेआधी पाकिस्तानचा जोरदार सराव
📸 Pakistan Shaheens ready for the contest 💪
The second four-day match against Bangladesh A starts tomorrow 🏏
Read more: https://t.co/sdsorJ3cnU#PAKvBAN pic.twitter.com/ySmYEIpOUW
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 19, 2024
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कॅप्टन), सौद शकील (उपकर्णधार) अब्दुल्लाह शफीक, सॅम अय्युब, बाबर आझम, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सलमान अली आघा, शाहीन शाह अफ्रिदी, नसीम शाह, खुर्रम शहझाद आणि मोहम्मद अली.
कसोटी मालिकेसाठी बांगलादेश टीम: नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटॉन कुमार दास, मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा, शरीफुल इस्लाम , हसन महमूद, तस्कीन अहमद आणि सय्यद खालेद अहमद.