PAK vs BAN: बांगलादेश इतिहास रचण्यासाठी सज्ज, पाकिस्तान लाज राखणार?
Pakistan vs Bangladesh 2nd Test : बागंलादेश क्रिकेट टीमने पाकिस्तान विरूद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे. बांगलादेशला विजयासह 2-0 ने मालिका जिंकण्यासाठी पाचव्या दिवशी 143 धावांची गरज आहे. तर पाकिस्तानसमोर लाज राखण्याचं आव्हान आहे.
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना हा रावळपिंडी स्टेडियम येथे खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील चौथ्या दिवशी पाकिस्तानने बांगलादेशला विजयासाठी 185 धावांचं आव्हान दिलं. बांगलादेशने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 42 धावा केल्या आहेत. त्यामुळे बांगलादेशला विजयासाठी पाचव्या आणि अंतिम दिवशी विजयासाठी 143 धावांची गरज आहे. बांगलादेश चौथ्याच दिवशी हे विजयी आव्हान पूर्ण करण्याच्या प्रयत्नात होती. मात्र चौथ्या दिवशी चहापानानंतर पावसाने एन्ट्री घेतली. त्यामुळे पाकिस्तानचा चौथ्या दिवशी पराभव टळला.
बांगलादेशने चौथ्या दिवशी टी ब्रेकपर्यंत 6 ओव्हरमध्ये 37 धावा केल्या. त्यानंतर दोन्ही संघ मैदानात आले. त्यानंतर फक्त एक ओव्हरचाच खेळ झाला. बांगलादेशनने या ओव्हरमध्ये 5 धावा केल्या. त्यानंतर ढग डाटून आले. त्यानंतर पंचांनी आपसात चर्चा करुन खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वेळ पाऊस झाला.
त्याआधी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानने 2 विकेट्स गमावून 9 धावा केल्या होत्या. त्यांनतर पाकिस्तानचा डाव चौथ्या दिवशी 172 धावांवर आटोपला. बांगलादेशकडून दुसऱ्या डावात झाकीर हसन 23 आणि शादमन इस्लाम याने नाबाद 9 धावा केल्या. त्यामुळे बांगलादेशला पाचव्या दिवशी विजयासाठी 143 धावांची गरज आहे आणि हातात 10 विकेट्सही आहेत. त्यामुळे पाकिस्तानसमोर पाचवा दिवशी आपली प्रतिष्ठा राखण्याचं आव्हान असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशकडे इतिहास रचण्याची संध आहे.
बांगलदेश इतिहास रचणार!
बांगलादेशने पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानवर 10 विकेट्सने विजय मिळवला होता. बांगलादेशने या विजयासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. बांगलादेशचा हा पाकिस्तान विरुद्धचा कसोटी क्रिकेटमधील पहिला विजय ठरला. आता बांगलादेशकडे पाकिस्तानला दुसऱ्या कसोटी मालिकेत हरवून क्लीन स्वीपसह मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.
बांगलादेश दुसऱ्या विजयापासून 143 धावा दूर
Pakistan 🆚 Bangladesh | 2nd Test Stumps – Day 04 | Bangladesh need 143 runs.
PC: PCB#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh #PAKvBAN #WTC25 pic.twitter.com/V2Omq2Pfyt
— Bangladesh Cricket (@BCBtigers) September 2, 2024
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, सैम अयुब, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, खुर्रम शहजाद, अबरार अहमद, मीर हमजा आणि मोहम्मद अली.
बांगलदेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, लिटन दास (विकेटकीपर), शकीब अल हसन, मेहदी हसन मिराझ, हसन महमूद, तस्किन अहमद आणि नाहिद राणा.