Video : मोक्याच्या क्षणी पाकिस्तानचा सलमान अघाने खाल्ली माती, बांगलादेशला जिंकवण्यात लावला हातभार

बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत पाकिस्तानने झेल सोडून पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की झेल सोडणं हक्क आहे. मोक्याच्या क्षणी विकेट घेऊन दबाव आणताना पाकिस्तानच्या खेळाडूंनी माती खाल्ली. एक तर विजयासाठी फक्त 185 धावा दिल्या होत्या. त्यामुळे विकेटचं महत्त्व किती ते समजू शकतो. पण पाकिस्तानच्या खेळाडूंनी याबाबतीत काही देणंघेणं नाही.

Video : मोक्याच्या क्षणी पाकिस्तानचा सलमान अघाने खाल्ली माती,  बांगलादेशला जिंकवण्यात लावला हातभार
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Sep 03, 2024 | 12:55 PM

बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंनी नको तेच केलं. म्हणजे स्वत:च हासं करून घेतलं. एक तर दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गमवल्याने दबाव होताच. त्यामुळे काहीही करून दुसऱ्या सामना जिंकण्याचं लक्ष होतं. पण पाकिस्तान आणि गचाळ क्षेत्ररक्षण हे एक समीकरणच आहे.त्यामुळे व्हायचं तेच झालं.  पाकिस्तानच्या खेळाडूने अखेर झेल सोडून दाखवला. त्यामुळे सोशल मीडियावर मनोरंजनात्मक पोस्ट व्हायरल व्हायला लागल्यात. पाकिस्तानने बांगलादेशसमोर विजयासाठी 185 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान गाठताना बांगलादेशने चांगली सुरुवात केली होती. त्यामुळे विकेट घेऊनच बांगलादेशवर दबाव टाकण्याची गरज होती. पाचव्या आणि शेवटच्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा बांगलादेशला झकीर हसनच्या रुपाने पहिला धक्का बसला. 40 धावांवर असताना मीर हमजाने त्याला त्रिफळाचीत केलं. त्यामुळे बांगलादेश बॅकफूटला गेली होती. कारण अजून दोन तीन विकेट पडल्या तर पाकिस्तान पकड मिळवेल हे जाहीर होतं. अशा महत्त्वाच्या क्षणी पाकिस्तानच्या खेळाडूंनी माती खाल्ली नाही असं कसं होईल.

17 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शदमन इस्लाम जाळ्यात अडकला होता. मीर हमजाच्या गोलंदाजीवर थेट झेल सलमान अघाच्या हाती झेल होता. पण त्याने काही हा झेल पकडला नाही. शदमनच्या बॅटची धार लागली आणि थेट दुसऱ्या स्लीपला उभ्या असलेल्या सलमान अघाच्या दिशेने गेला. त्याने उडी घेतली आणि चेंडूही हाताला लागला. पण झेल काही पकडता आला नाही. शदमनचा झेल सोडला तेव्हा तो 17 धावांवर होता. पण त्यात आणखी 7 धावांची भर पडली आणि 24 धावा करून बाद झाला. खरं तर प्रत्येक धाव महत्त्वाची होती. त्यामुळे झेल पकडला असता तर दबाव आणि सात धावा वाचल्या असत्या.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, सइम अयुब, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, खुर्रम शहजाद, अबरार अहमद, मोहम्मद अली, मीर हमजा.

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, लिटन दास (विकेटकीपर), शकीब अल हसन, मेहदी हसन मिराझ, हसन महमूद, तस्किन अहमद, नाहिद राणा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.