PAK vs BAN: पाकिस्तानचा पराभवानंतर दुसऱ्या कसोटीआधी मोठा निर्णय, नक्की काय?

Pakistan vs Bangladesh Test Series 2024: पाकिस्तान टीमला पहिल्या कसोटीत बांगलादेशकडून लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे.

PAK vs BAN: पाकिस्तानचा पराभवानंतर दुसऱ्या कसोटीआधी मोठा निर्णय, नक्की काय?
pakistan cricket teamImage Credit source: Pakistan Cricket X Account
Follow us
| Updated on: Aug 28, 2024 | 5:58 PM

पाकिस्तानला पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशकडून मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. बांगलादेशने पाकिस्तानवर 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. बांगलादेशचा पाकिस्तानवर कसोटी क्रिकेटमध्ये मिळवलेला पहिला विजय ठरला. तसेच बांगलादेश पाकिस्तानला त्यांच्यात घरात 10 विकेट्सने पराभूत करणारी पहिली टीम ठरली. बांगलादेशने या विजयासह 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानला मालिका गमवायची नसेल तर, दुसऱ्या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावाच लागणार आहे.

दोघांचा पुन्हा समावेश

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दुसऱ्या कसोटीआधी मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचे पराभवानंतर डोळे उघडले आहेत. पाकिस्तानने दुसऱ्या कसोटीसाठी संघात 2 खेळाडूंना नव्याने संधी दिली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. अबरार अहमद आणि कामरान गुलाम या दोघांना दुसऱ्या कसोटीसाठी संघात स्थान देण्यात आलं आहे. या दोघांना पहिल्या कसोटीआधी मुक्त करण्यात आलं होतं. मात्र आता पु्न्हा संधी देण्यात आली आहे. उभयसंघातील दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्याला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.

अबरार आणि कामरान हे दोघेही नुकतेच पाकिस्तान शाहीन्स टीमसाठी खेळले. हे दोघेही बांगलादेश ए विरूद्धच्या सामन्यात खेळले. हा सामना इस्लामाबाद क्लबमध्ये खेळवण्यात आला होता. अबरार हा लेग स्पिनर आहे. तसेच तो बॅटिंगही करतो. कर कामरान बॅट्समन आहे. पाकिस्तान पहिल्या सामन्यात स्पिनरशिवाय मैदानात उतरली होती. त्यामुळे अबरारला संधी मिळू शकते.

दुसऱ्या कसोटीसाठी दोघांचा समावेश

दुसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानचा सुधारित संघ : शान मसूद (कॅप्टन), सऊद शकील, अबरार अहमद, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, कामरान गुलाम, खुर्रम शहजाद, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), नसीम शाह, सॅम अयूब, सलमान अली आगाह, सरफराज अहमद (विकेटकीपर), शाहीन शाह अफरीदी आणि आमिर जमाल (फिटनेस).

कसोटी मालिकेसाठी बांगलादेश टीम : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराझ, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद, नाहिद राणा, खालेद अहमद, नईम हसन, तस्किन अहमद आणि तैजुल इस्लाम.

म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले..
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले...
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी.
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार.
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी.
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी.
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार.