Asia Cup 2023 | Pakistan ला टीम इंडिया विरुद्धच्या सामन्याआधी मोठा धक्का, घातक बॉलर ‘आऊट’?
Pakistan vs India Asia Cup 2023 Super 4 | पाकिस्तान सुपर 4 मधील दुसरा सामना टीम इंडिया विरुद्ध खेळणार आहे. त्या सामन्याआधी पाकिस्तानसाठी वाईट बातमी आहे. त्यांचा स्टार बॉलर टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यातून बाहेर होऊ शकतो.
लाहोर | पाकिस्तानने सुपर 4 मधील पहिल्या सामन्यात बांगलादेशवर 7 विकेट्सने विजय मिळवला. बांगलादेशने विजयासाठी दिलेलं 194 धावांचं आव्हान हे पाकिस्तानने 39.3 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केल. मोहम्मद रिझवान आणि ईमाम उल हक या दोघांनी विजयाचा पाया रचला. ईमामने 78 आणि मोहम्मद रिझवान याने 63* धावांची अर्धशतकी खेळी केली. तर त्याआधी पाकिस्तानकडून हरीस रऊफ याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर नसीम शाह याने 3 विकेट्स घेत चांगली साथ दिली. पाकिस्तानने विजयामुळे फायनलसाठी आपला दावा भक्कम केलाय. आता पाकिस्तान सुपर 4 मधील दुसरा सामना हा टीम इंडिया विरुद्ध खेळणार आहे. त्याआधी पाकिस्तानसाठी वाईट बातमी आली आहे.
पाकिस्तानचा आघाडीचा गोलंदाज हा टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यातून बाहेर होऊ शकतो. पाकिस्तानच्या स्टार बॉलरला बांगलादेश विरुद्धच्या सामन्यादरम्यान माठा झटका लागला. वेगवान गोलंदाज नसीम शाह याला फिल्डिंग दरम्यान दुखापत झाली. त्यामुळे नसीम शाह याला मैदानाबाहेर जावं लागलं. नसीमने फाईन लेगवर बाऊंड्री रोखण्यासाठी जीवाची बाजी लावून डाईव्ह मारली. मात्र प्रयत्नात त्याच्या खांद्याला दुखापत झाली.
नसीम शाह याची स्थिती किती गंभीर आहे,याबाबतची अधिकृत माहिती मिळाली नाही. मात्र नसीम टीम इंडिया विरुद्ध 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सामन्यात बाहेर पडू शकतो. नसीम शाह याने बांगलादेश विरुद्ध 5.4 ओव्हर बॉलिंग केली. नसीमने या दरम्यान 34 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे आता नसीम शाह पाकिस्तान विरुद्ध खेळणार की नाही, याकडे सर्वांचंच लक्ष आहे. मात्र नसीमला दुखापतीमुळे भारत विरुद्ध खेळता आलं नाही, तर तो पाकिस्तानसाठी मोठा झटका असेल.
बांगलादेश प्लेईंग इलेव्हन | शाकिब अल हसन (कॅप्टन), मोहम्मद नईम, लिटॉन दास, तोहिद हृदाय, शमिम होसेन, मुशफिकर रहिम (विकेटीपर), अफीफ होसेन, मेहदी हसन मिराज, तास्किन अहमद, शोरिफूल इस्लाम आणि हसन महमुद.
पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, सलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन शाह अफ्रिदी आणइि हरीस रौफ.