Jasprit Bumrah | जसप्रीत बुमराह याला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी मोठा धक्का
Jasprit Bumrah Asia Cup 2023 | टीम इंडिया आशिया कप 2023 मध्ये सुपर 4 मधील पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध 2 हात करणार आहे. त्याआधी जसप्रीत बुमराह याच्यासाठी वाईट बातमी समोर आली आहे.
मुंबई | आशिया कप 2023 स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना हा श्रीलंकेने जिंकला. अफगाणिस्तानला सुपर 4 मध्ये क्वालिफाय करण्यासाठी 37.1 ओव्हरमध्ये 292 धावांचं आव्हान पूर्ण करायचं होतं. अफगाणिस्तानने चांगली झुंज देत सामना शेवटपर्यंत खेचला. अफगाणिस्तानला विजयासाठी शेवटच्या म्हणजेच 38 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर 3 धावांची गरज होती. मात्र फझलहक फारुकी आऊट झाला आणि अफगाणिस्तानचा डाव आटोपला. श्रीलंकेने अशाप्रकारे सामना 2 धावांनी जिंकला आणि सुपर 4 फेरी गाठली.
श्रीलंकेच्या विजयासह सुपर 4 मधील 4 संघ निश्चित झाले. ग्रुप ए मधून पाकिस्तान आणि टीम इंडिया सुपर 4 मध्ये पोहचले. तर बी ग्रुपमधून बांगलादेश आणि श्रीलंका सुपर 4 मध्ये पोहचली. तर नेपाळ आणि अफगाणिस्तानचं आव्हान संपुष्टात आलं. टीम इंडिया सुपर 4 मधील पहिला सामना हा 10 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याच्यासाठी वाईट बातमी समोर आली आहे.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरीस रौफ याने जसप्रीत बुमराह याचा रेकॉर्ड ब्रेक केल आहे. हरीस रौफ याने सुपर 4 मधील पहिल्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध विकेट्सचं अर्धशतक पूर्ण केलंय. हरीस पाकिस्तानकडून वेगवान 50 विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. हरीसने बांगलादेशच्या मोहम्मद नईम याला 8 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर आऊट केलं आणि 50 वी विकेट घेतली.
हरीसची विक्रमी कामगिरी
Third-fastest Pakistan bowler to 5️⃣0️⃣ ODI wickets! 🙌@HarisRauf14 roars with his pace upfront 🔥#PAKvBAN | #AsiaCup2023 pic.twitter.com/m32aPc7OxH
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 6, 2023
हरीसने फक्त 27 डावांमध्ये ही कामगिरी केलीय. हरीसने यासह पाकिस्तान माजी दिग्गज साकेलन मुस्ताक, जसप्रीत बुमराह आणि अनेक गोलंदाजांचा रेकॉर्ड झटक्यात ब्रेक केला आहे. साकेलन मुस्ताक, जसप्रीत बुमराह यांच्यासह एकूण 10 जणांनी वनडेत 28 डावांमध्ये 50 विकेट्स घेतल्या आहेत.
वकार युनूसच्या रेकॉर्डची बरोबरी
Haris Rauf 🤝 Waqar Younis pic.twitter.com/9tfTAJPqkK
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 6, 2023
पाकिस्तानचा तिसरा बॉलर
दरम्यान पाकिस्तानकडून वेगवान 50 विकेट्स घेण्याचा विक्रम हा हसन अली याच्या नावावर आहे. हसनने 24 डावात ही कामगिरी केलीय. तर शाहीन शाह अफ्रिदी याने 25 डावात विकेट्सचं अर्धशतक पूर्ण केलंय. त्यानंतर आता हरीसने तिसरं स्थान मिळवत बाजी मारली आहे.
बांगलादेश प्लेईंग इलेव्हन | शाकिब अल हसन (कॅप्टन), मोहम्मद नईम, लिटॉन दास, तोहिद हृदाय, शमिम होसेन, मुशफिकर रहिम (विकेटीपर), अफीफ होसेन, मेहदी हसन मिराज, तास्किन अहमद, शोरिफूल इस्लाम आणि हसन महमुद.
पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, सलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन शाह अफ्रिदी आणइि हरीस रौफ.