Test Cricket: दुसऱ्या कसोटी सामन्याचं ठिकाण बदललं, नक्की कारण काय?

Test Cricket: क्रिकेट बोर्डाने कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याचं ठिकाण अखेरच्या क्षणी बदलण्यात आलं आहे. जाणून घ्या यामागचं नक्की कारण काय?

Test Cricket: दुसऱ्या कसोटी सामन्याचं ठिकाण बदललं, नक्की कारण काय?
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: ICC
Follow us
| Updated on: Aug 18, 2024 | 10:43 PM

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला बुधवार 21 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. बांगलादेश या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांसाठी ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025 साखळीच्या हिशोबाने फार महत्त्वाची आहे. त्यात बांगलादेला अद्याप कधीच पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे बांगलादेशने या मालिकेआधी जोरदार सरावाला सुरुवात केली आहे. नजमुल हुसैन शांतो बांगलादेशचं तर शान मसूद पाकिस्तानचं नेतृ्त्व करणार आहे. त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे.

उभयसंघातील दुसर्‍या सामन्याचं ठिकाण तडकाफडकी बदलण्यात आलं आहे. हा सामना आधी कराची येथे खेळवण्यात येणार होता. मात्र आता तो सामना रावळपिंडी येथे होणार आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा इथेच रावळपिंडी येथे आयोजित करण्यात आला आहे. कराची नॅशनल स्टेडियमचं दुरूस्तीचं काम सुरु असल्याने कारणाने सामन्याचं ठिकाण बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानात 2025 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच दुरुस्तीच्या कारणामुळेच दुसरा कसोटी सामना हा बंद दाराआड अर्थात क्रिकेट चाहत्यांविना होणार असल्याचं याआधीच स्पष्ट करण्यात आलं होतं.

क्रिकेट चाहत्यांच्या उपस्थितीत कराची स्टेडियममध्ये सामना खेळवल्यास दुरुस्तीच्या कामात व्यत्यय येईल, असं कामगारांनी सांगितलं होतं. तसेच दुरुस्तीच्या कामादरम्यान खेळाडूंसह, ब्रॉडकास्टर्स आणि उपस्थितीत क्रिकेट चाहत्यांना धुळीचा त्रास होऊ नये, याची खबरदारी घेत हा निर्णय घेतला गेला आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 21 ते 25 ऑगस्ट, रावळपिंडी

दुसरा सामना, 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर, रावळपिंडी

कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान टीम : शान मसूद (कॅप्टन), सऊद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, बाबर आजम, कामरान गुलाम, खुर्रम शहजाद, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), नसीम शाह, सॅम अयूब, सलमान अली आगा, सरफराज अहमद (विकेटकीपर) आणि शाहीन शाह अफरीदी.

कसोटी मालिकेसाठी बांगलादेश टीम : नजमुल हुसैन शांतो (कर्णधार), महमूदुल हसन जॉय, जाकिर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन कुमार दास, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, नईम हसन, तस्कीन अहमद, सयद खालिद अहमद, नाहिद राणा, शोरफुल इस्लाम आणि हसन महमूद.

चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.