PAK vs BAN : पराभव होणार हे कळताच पाकिस्तानचा रडीचा डाव! अब्रारला पंचांनी थेट दिली वॉर्निंग
कसोटी मालिका जिंकत बांगलादेशने पाकिस्तानमध्ये इतिहास रचला आहे. दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने जिंकत पाकिस्तानला व्हाईट वॉश दिला आहे. बांगलादेशने या विजयासह इतिहास रचला आहे. यापूर्वी कधीच बांगलादेशने व्हाईट वॉश दिला नव्हता. त्यामुळे पाकिस्तानकडून रडीचा डावा खेळला गेला.
बांगलादेशने पाकिस्तानला त्यांच्याच भूमीत लोळवलं आहे. दोन सामन्यांची कसोटी मालिका पाकिस्तानने 2-0 ने जिंकली आणि इतिहास रचला. पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर पाकिस्तानवर दुसऱ्या कसोटीत दडपण होतं. झालंही तसंच बांगलादेशचा संघ दुसऱ्या कसोटीत पाकिस्ताानवर हावी झाला. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नाणेफेकीचा कौल झाला आणि बांगलादेशने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात पाकिस्तानने सर्वबाद 274 धावा केल्या. तर प्रत्युत्तरात बांगलादेशने 262 धावा केल्या. पाकिस्तानकडे 12 धावांची आघाडी होती आणि पुढे खेळ सुरु झाला. दुसऱ्या डावात पाकिस्तानचे फलंदाज खेळपट्टीवर हजेरी लावून परतत होते. पाकिस्तानला सर्वबाद 172 धावा करता आल्या. 12 धावांची आघाडी आणि 172 धावा अशा 184 धावा झाल्या आणि विजयासाठी 185 धावांचं आव्हान मिळालं. हे आव्हान बांगलादेश सहज गाठेल असं चौथ्या दिवशीच वाटलं होतं. कारण बांगलादेच्या सलामीच्या जोडीने चांगली सुरुवात करून दिली होती.
पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा पाकिस्तानने दोन विकेट मिळवल्या. पण या व्यतिरिक्त झटपट विकेट घेता काही आल्या नाही. चार विकेट पडेपर्यंत बांगलादेशने विजयापर्यंत कूच केली होती. त्यामुळे पाकिस्तानचा रडीचा डाव सुरु झाला. अब्रारने खेळपट्टीसोबत जाणीवपूर्वक धावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. एकदा नाही तर दोनदा डेंजर झोनमध्ये आला. खेळपट्टीच्या या भागात येण्यास मनाई असते. पण अब्रारला पराभव समोर दिसत असल्याने खेळपट्टीशी छेडछाड करत असावा अशी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. पंचांच्या ही बाब लक्षात आली त्यांनी अब्रारला थेट वॉर्निंग दिली. अब्रारला सामन्यात दुसऱ्यांदा पंचांनी असं करण्याबाबत बजावलं. पंच रिचर्ड केटलबरो यांनी हा इशारा दिला. तसेच कर्णधार शान मसूदलाही ताकीद दिली. 49 वं षटक टाकण्यापूर्वी अब्रारने असं केलं.
बांगलादेशने पाकिस्तानला पहिल्या कसोटीत 10 विकेट राखून पराभूत केलं होतं. त्यानंतर दुसरा कसोटी सामना 6 विकेटने जिंकला आहे. बांगलादेशने दुसऱ्या देशात आतापर्यंत 8 कसोटी सामने जिंकले आहेत. 2009 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 2-0 ने, 2021मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 1-0, पाकिस्तानविरुद्ध 2, श्रीलंकेविरुद्ध 1 आणि न्यूझीलंडविरुद्ध 1 कसोटी सामना जिंकला आहे.