PAK vs BAN : बांगलादेशला कसोटी मालिकेआधी मोठा झटका, स्टार खेळाडू आऊट!
Pakistan vs Bangladesh Test Series: पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेआधी पाहुण्या संघाला मोठा झटका लागला आहे.
पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 21 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी बांगलादेशच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. बांगलादेशचा ओपनर बॅट्समन महमूदल हसन दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे बांगलादेशला कसोटी मालिकेआधी मोठा झटका लागला आहे. मात्र याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सलामीचा सामना हा रावळपिंडी येथे खेळवण्यात येणार आहे.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे हेड फिजीशियने सांगितलं की या मालिकेआधी आम्हाला महमूदल हसन याच्या संदर्भात एक मेल मिळाला आहे. त्या मेलमध्ये महमूदल याला ग्रोईन इंजरी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे महमूदल याला 3 आठवडे विश्रांती करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
महमूदल दुखापत कशी झाली?
उभयसंघातील मालिकेआधी पाकिस्तान शाहींस विरुद्ध बांगलादेश ए यांच्यात रेड बॉल मॅच खेळवण्यात येत आहे. महमूदल याला या सामन्यात फिल्डिंग दरम्यान दुखापत झाली. हसनने या सामन्यातील पहिल्या डावात 65 धावांची खेळी केली. मात्र दुसऱ्या डावात त्याला दुखापतीमुळे खेळता आलं नाही. तसेच महमूदल कसोटी मालिकेला मुकावं लागणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे.
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 21 ते 25 ऑगस्ट, रावळपिंडी
दुसरा सामना, 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर, कराची
कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान टीम : शान मसूद (कॅप्टन), सऊद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, बाबर आजम, कामरान गुलाम, खुर्रम शहजाद, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), नसीम शाह, सॅम अयूब, सलमान अली आगा, सरफराज अहमद (विकेटकीपर) आणि शाहीन शाह अफरीदी.
कसोटी मालिकेसाठी बांगलादेश टीम : नजमुल हुसैन शांतो (कर्णधार), महमूदुल हसन जॉय, जाकिर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन कुमार दास, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, नईम हसन, तस्कीन अहमद, सयद खालिद अहमद, नाहिद राणा, शोरफुल इस्लाम आणि हसन महमूद.