PAK vs BAN : पाकिस्तानला तगडा धक्का, मॅचविनर खेळाडू मालिकेतून बाहेर

Pakistan vs Bangaldesh : पाकिस्सतान आणि बांगलादेश या दोन्ही संघांसाठी ही 2 सामन्यांची कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळीच्या हिशोबाने महत्त्वाची आहे. मात्र त्याआधीच पाकिस्तानला मोठा झटका लागला आहे.

PAK vs BAN : पाकिस्तानला तगडा धक्का, मॅचविनर खेळाडू मालिकेतून बाहेर
pakistan cricket teamImage Credit source: icc
Follow us
| Updated on: Aug 19, 2024 | 5:28 PM

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 21 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. बांगलादेश या मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर आहे. नजमूल हुसैन शांतो हा या मालिकेत बांगलादेशचं नेतृत्व करणार आहे. तर शान मसूद हा पाकिस्तानचा कर्णधार आहे. या कसोटी मालिकेला शेवटचे काही तास बाकी असताना पाकिस्तानला मोठा झटका लागला आहे. पाकिस्तानचा ऑलराउंडर आमेल जमाल दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. आमेरला पाठीच्या दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे.

आमेरने कसोटी कारकीर्दीची शानदार सुरुवात केली होती. आमेरने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 18 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र आमेर मे पासून दुखापतीशी लढत होता. बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानची घोषणा करण्यात आली, तेव्हाच आमेरला पूर्णपणे फिट असल्यास त्याला संधी दिली जाईल. आमेर दुसर्‍या कसोटीपर्यंत कमबॅक करेल, असं म्हटलं जात होतं. मात्र त्याला आता दुर्देवाने मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. दरम्यान आमेरच्या जागी बदली खेळाडूच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.

दुसऱ्या सामन्याचं ठिकाण बदललं

दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने उभयसंघातील दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्याचं ठिकाण बदललं आहे. स्टेडियममधील दुरुस्तीच्या कारणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार हा दुसरा सामना आता लाहोरऐवजी रावळपिंडी येथेच होणार आहे. मालिकेतील सलामीचा सामना ही याच रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.

पाकिस्तानला मोठा झटका

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 21 ते 25 ऑगस्ट, रावळपिंडी

दुसरा सामना, 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर, रावळपिंडी

कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान टीम: शान मसूद (कॅप्टन), सौद शकील (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, खुर्रम शहजाद, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), नसीम शाह, सैम अयुब, सलमान अली आगा, सरफराज अहमद (विकेटकीपर) आणि शाहीन आफ्रिदी.

कसोटी मालिकेसाठी बांगलादेश टीम: नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटॉन कुमार दास, मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा, शरीफुल इस्लाम , हसन महमूद, तस्कीन अहमद आणि सय्यद खालेद अहमद.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.