PAK vs CAN: मोहम्मद रिझवानची अर्धशतकी खेळी, पाकिस्तानच्या विजयासह आशा कायम

Pakistan vs Canada: पाकिस्तानने करो या मरो सामन्यात कॅनडावर विजय मिळवला. पाकिस्तानने या विजयासह स्पर्धेतील आपलं आव्हान कायम ठेवलं आहे.

PAK vs CAN: मोहम्मद रिझवानची अर्धशतकी खेळी, पाकिस्तानच्या विजयासह आशा कायम
Babar Azam pakistan vs canadaImage Credit source: pcb x account
Follow us
| Updated on: Jun 11, 2024 | 11:39 PM

पाकिस्तान क्रिकेट टीमने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 22 व्या सामन्यात कॅनडावर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. कॅनडाने पाकिस्तानला विजयासाठी 107 धावांचं आव्हान दिलं होतं. पाकिस्तानने हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात 17.3 ओव्हरमध्ये सहज पूर्ण केलं. मोहम्मद रिझवान पाकिस्तानच्या विजयाचा हिरो ठरला. रिझवानने नाबाद अर्धशतकी खेळी केली. तसेच कॅप्टन बाहर आझम यानेही विजयात योगदान दिलं. पाकिस्तानचा हा या स्पर्धेतील पहिला विजय ठरला. पाकिस्तानने या विजयासह स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. पाकिस्तानसाठी मोहम्मद रिझवान याने सर्वाधिक 53 धावांची नाबाद खेळी केली. सॅम अय्युब ने 6 धावा जोडल्या. कॅप्टन बाबर आझमने 33 रन्स केल्या. फखर झमानने 4 आणि उस्मान खान याने नाबाद 2 धावा केल्या. तर कॅनडाकडून डिलन हेलिगर याने 2 विकेट्स घेतल्या. तर जेरेमी गॉर्डन याने 1 विकेट घेतली.

त्याआधी पाकिस्तानने टॉस जिंकून कॅनडाला बॅटिंगसाठी बोलावलं. पाकिस्तानच्या गोलंदाजीसमोर कॅनडाचे फलंदाज निष्प्रभ ठरले. कॅनडाकडून तिघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. कॅनडाकडून आरोन जोनसन याने 44 बॉलमध्ये सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. कॅप्टन साद बिन झफर याने 10 आणि कलीम सना याने नाबाद 13 धावा केल्या. डिलन हेलिगर नॉट आऊट 9 रन्स केल्या.रवींदरपॉल याला भोपळाही फोडता आला नाही. तर इतर फलंदाज अपयशी ठरले. कॅनडाने अशाप्रकारे 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 106 धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिर आणि हरीस रौफ जोडीने प्रत्येकी 2-2 विके्टस घेतल्या. तर शाहिन आफ्रिदी आणि नसीम शाह या दोघांनी 1-1 फलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

पाकिस्तानने मोठी संधी गमावली

पाकिस्तानने हा सामना जिंकला खरा, पण त्यांनी मोठी संधी गमावली. पाकिस्तानला ही एक घोडचूक किती महागात पडणार हे येत्या काही दिवसांनंतर स्पष्ट होईल. पाकिस्तानला हा सामना 14 ओव्हरमध्ये जिंकून नेट रनरेट सुधारण्याची संधी होती. ए ग्रुपमधील टीम इंडिया आणि यूएसएने खेळलेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहेत. तर पाकिस्तानने सलग 2 सामन्यानंतर पहिला विजय मिळवला आहे. त्यामुळे पाकिस्तानकडे कॅनडा विरुद्ध 107 धावांचं आव्हान हे 14 ओव्हरमध्ये पूर्ण करुन नेट रनरेट सुधारण्याची संधी होती. मात्र पाकिस्तानने ती संधी गमावली.

पाकिस्तानचा पहिला विजय

कॅनडा प्लेइंग ईलेव्हन : साद बिन जफर (कॅप्टन), श्रेयस मोव्वा (विकेटकीपर), आरोन जॉन्सन, नवनीत धालीवाल, परगट सिंग, निकोलस किर्टन, रविंदरपाल सिंग, डिलन हेलिगर, कलीम सना, जुनैद सिद्दीकी आणि जेरेमी गॉर्डन.

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन: बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सॅम अयुब, फखर जमान, उस्मान खान, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि मोहम्मद अमीर.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.