PAK vs ENG: कॅप्टनचं दीडशतक, दोघांची शतकी खेळी, पाकिस्तानच्या इंग्लंड विरुद्ध पहिल्या डावात 556 धावा
Pakistan vs England 1st Test Day 2: पाकिस्तानने पहिल्या डावात इंग्लंड विरुद्ध 556 धावांपर्यंत मजल मारली आहे. पाकिस्तानकडून दोघांनी शतक ठोकलंय. तर कॅप्टनने दीडशतकी खेळी केली आहे.

पाकिस्तानचा पहिल्या कसोटी सामन्यातील पहिला डाव दुसऱ्या दिवशी आटोपला आहे. पाकिस्तानने मुल्तान क्रिकेट स्टेडियममध्ये विक्रमी धावा केल्या आहेत. पाकिस्तानने 149 ओव्हरमध्ये ऑलआऊट 556 धावा केल्या आहेत. पाकिस्तानकडून एकाने दीडशतक तर दोघांनी शतकी खेळी केली आहे. या त्रिकुटाने केलेल्या या खेळीच्या जोरावर आणि इतर सहकाऱ्यांनी दिलेल्या योगदानाच्या मदतीने पाकिस्तानला इंग्लंड विरुद्ध पहिल्या डावात 550 पार मजल मारता आली.
पाकिस्तानकडून कॅप्टन शान मसूद याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. शानने 177 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 151 धावा केल्या. ओपनर अब्दुल्ला शफीक याने 184 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 10 फोरसह 102 रन्स केल्या. तर आघा सलमान याने 119 बॉलमध्ये 10 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 104 धावांची नाबाद खेळी केली. या तिघांव्यतिरिक्त सौद शकीलने 177 बॉलमध्ये 8 फोरसह 82 रन्स केल्या. नसीम शाह याने 33 धावांचं योगदान दिलं. बाबर आझम याला चांगली सुरुवात मिळाली, मात्र त्याला या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. बाबरने 71 चेंडूत 5 चौकारांसह 30 धावा केल्या.
शाहिन अफ्रिदी यानेही अखेरच्या क्षणी योगदान दिलं. शाहिनने 1 सिक्स आणि 2 फोरसह 26 धावांची भर घातली. सॅम अय्युबने 4, अब्रार अहमद 3 आणि आमेर जमालने 7 धावा केल्या. तर विकेटकीर मोहम्मद रिझवान याला भोपळाही फोडता आला नाही. इंग्लंडकडून 7 जणांनी बॉलिंग केली. त्यापैकी जॅक लीच याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. गस एटकिन्सन आणि ब्रायडन कार्स या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर ख्रिस वोक्स, शोएब बशीर आणि जो रुट या तिघांनी 1-1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
पाकिस्तानच्या पहिल्या डावात 556 धावा
Pakistan 556 all out ☝
Time for work with the bat 🏏
Match Centre: https://t.co/M5mJLlHALN
🇵🇰 #PAKvENG 🏴 | #EnglandCricket pic.twitter.com/FHNPGJUuFh
— England Cricket (@englandcricket) October 8, 2024
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कॅप्टन), सॅम अयुब, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि अबरार अहमद.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस एटकिन्सन, ब्रायडन कार्स, जॅक लीच आणि शोएब बशीर.