PAK vs ENG: इंग्लंडला धक्का, पाकिस्तान विरूद्धच्या पहिल्या कसोटीतून स्टार खेळाडू आऊट, कुणाला संधी?
Pakistan vs England 1st Test : पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यात 7 ऑक्टोबरपासून मुल्तान येथे पहिला कसोटी सामना खेळण्यात येणार आहे. इंग्लंडने या सामन्यासाठी 2 दिवसांआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध मायदेशात एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर आता इंग्लंड पाकिस्तान दौऱ्यावर आहे. इंग्लंड पाकिस्तान विरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या हिशोबाने इंग्लंडसाठी ही निर्णायक मालिका आहे. या मालिकेतील पहिला सामान हा 7 ऑक्टोबरपासून मुल्तान येथे खेळवण्यात येणार आहे. या पहिल्या सामन्याआधी इंग्लंडला मोठा झटका लागला आहे. इंग्लंडचा नियमित कर्णधार बेन स्टोक्स हा दुखापतीमुळे पहिल्या सामन्यातून बाहेर पडला आहे. इंग्लंडने पहिल्या सामन्यासाठी 2 दिवसांआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
बेन स्टोक्स याला द हन्ड्रेड स्पर्धेत दुखापत झाली होती. स्टोक्स याला दुखापतीतून अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे स्टोक्सला पहिल्या सामन्याला मुकावं लागलं आहे. स्टोक्सच्या जागी हॅरी ब्रूक सलामीच्या सामन्यात इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. ब्रूकने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही इंग्लंडचं नेतृत्व केलं होतं. ब्रूकच्या कॅप्टन्सीत इंग्लंडने ही सीरिज 2-1 ने जिंकली होती.
ब्रायडन कार्सचं पदार्पण
इंग्लंड टीम मॅनेजमेंटने वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स याला पदार्पणाची संधी दिली आहे. तसेच ख्रिस वोक्स 2016 नंतर पहिल्यांदाच आशियात तर अडीच वर्षांनंतर इंग्लंडबाहेर कसोटी सामना खेळणाता दिसणार आहे.
इंग्लंडची पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर
We have announced our XI for the first Test against Pakistan in Multan 📝
🇵🇰 #PAKvENG 🏴 | #EnglandCricket 🦁
— England Cricket (@englandcricket) October 5, 2024
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ओली पोप (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ब्रायडन कार्स, जॅक लीच आणि शोएब बशीर.
पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तान क्रिकेट टीम : शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, बाबर आझम, मीर हमजा, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, नोमान अली, सैम अयुब, सलमान अली आगा, सरफराज अहमद आणि शाहीन शाह आफ्रिदी.