PAK vs ENG : इंग्लंडनंतर पाकिस्तानची प्लेइंग ईलेव्हन जाहीर, कुणाला संधी?

Pakistan vs England 1st Test Playing 11 : इंग्लंडनंतर पाकिस्तानने पहिल्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे. पाकिस्तान संघात शाहिन शाह अफ्रिदीचं कमबॅक झालं आहे.

PAK vs ENG : इंग्लंडनंतर पाकिस्तानची प्लेइंग ईलेव्हन जाहीर, कुणाला संधी?
pakistan team shaheen afridiImage Credit source: shaheen afridi x account
Follow us
| Updated on: Oct 06, 2024 | 4:36 PM

पाकिस्तानला गेल्या कसोटी मालिकेत बांगलादेशकडून 2-0 अशा एकतर्फी फरकाने पराभव स्वीकारावा लागला. तर इंग्लंडने मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-3 ने गमावली. त्यानंतर आता इंग्लंड पाकिस्तान दौऱ्यावर आहे. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकूण 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. मालिकेतील पहिला सामना हा सोमवार 7 ऑक्टोबररपासून मुल्तान क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. त्याआधी पाकिस्तानने प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती दिली आहे.

शान मसूद पाकिस्तानचं या मालिकेत इंग्लंड विरुद्ध नेतृत्व करणार आहे. पाकिस्तान संघात शाहीन शाह अफ्रिदी आणि नसीम शाह या दोघांचं प्लेइंग ईलेव्हनमध्ये पुनरागमन झालं आहे. या दोघांना बांग्लादेश विरूद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात संधी देण्यात आली नव्हती. तसेच वेगवान गोलंदाज आमिर जमाल यालाही संधी दिली आहे. आमिर दुखापतीमुळे गेली अनेक दिवस संघातून बाहेर होता.

हे सुद्धा वाचा

पाकिस्तानसाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या हिशोबाने ही मालिका फार महत्त्वाची आहे. पाकिस्तानने या मालिकेत इंग्लंडला पराभूत केलं आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेवर 2-0 ने मात केली तर त्यांचे अंतिम फेरीत पोहचण्याची शक्यता वाढेल. त्यामुळे पाकिस्तान मायदेशातील या मालिकेत कशी कामगिरी करते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

दरम्यान इंग्लंडने शनिवारी 5 ऑक्टोबरला पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली. नियमित कर्णधार बेन स्टोक्स याला दुखापतीमुळे पहिल्या सामन्याला मुकावं लागलं आहे. स्टोक्सच्या जागी हॅरी ब्रूक नेतृत्व करणार आहे. तर झॅक क्राउली आणि जॅक लीच या दोघांचं कमबॅक झालं आहे.

पाकिस्तानची प्लेइंग ईलेव्हन जाहीर

पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (विकेटकीपर) , सईम अयूब, अब्दुल्लाह शफीक, बाबर आजम, सऊद शकील, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सलमान अली आगा, आमिर जमाल, शाहीन शाह अफरीदी, नसीम शाह आणि अबरार अहमद.

पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ओली पोप (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ब्रायडन कार्स, जॅक लीच आणि शोएब बशीर.

'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.