पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ आटोपला आहे. पाकिस्तानने मुल्तान क्रिकेट स्टेडियममध्ये 90 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 259 धावा केल्या. पाकिस्तानकडून बाबर आझम याच्या जागी समावेश करण्यात आलेल्या कामरान गुलाम याने पदार्पणातच धमाका केला. कामरानने शतकी खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तर सॅम अय्युब याने अर्धशतकी खेळी केली. इतर तिघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर खेळ संपला तेव्हा विकेटकीपर मोहम्मद रिझवान आणि आघा सलमान ही जोडी नाबाद परतली.
पाकिस्तानने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र इंग्लंडने बॅटिंगसाठी आलेल्या पाकिस्तानला झटपट 2 झटके दिले. अब्दुल्लाह शफीक आणि कॅप्टन शान मसूद हे दोघे आठव्या आणि दहाव्या ओव्हरमध्ये आऊट झाले. जॅक लीच याने या दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. अब्दुल्लाहने 7 आणि शानने 3 धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानची 2 बाद 19 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर सॅम अयुब आणि कामरान गुलाम या दोघांनी पाकिस्तानचा डाव सावरत मोठी भागीदारी केली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 149 धावांची भागीदारी केली. मॅथ्यू पॉट्स याने ही जोडी फोडली सॅम अयुब याने 160 बॉलमध्ये 7 चौकारांच्या मदतीने 77 धावा केल्या.
पाकिस्तानने त्यांतर चौथी विकेटही लवकर टाकली. सॅमनंतर सौद शकील 4 धावा करुन बाद झाला आणि पाकिस्तानची स्थिती 178 वर 4 आऊट अशी झाली. त्यानंतर कामरान गुलाम आणि मोहम्मद रिझवान या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 65 धावा जोडल्या. कामरानने या दरम्यान शतकी खेळी केली. कामरान पदार्पणात शतक करणार तेरावा पाकिस्तानी ठरला. मात्र कामरानला शतकांतर फक्त 18 धावाच जोडता आला आणि त्यानंतर तो आऊट झाला. कामरानने 224 बॉलमध्ये 11 फोर आणि 1 सिक्ससह 118 रन्स केल्या. तर त्यानंतर मोहम्मद रिझवान 37 आणि आघा सलमान 5 धावा करुन नाबाद परतला आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला
Kamran Ghulam’s debut ton headlines day one of the second Test 💫
Pakistan are 259-5 with Rizwan and Salman at the crease 🏏
Scorecard: https://t.co/sDVJBTiJUN#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/QswdlovcEm
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 15, 2024
तर इंग्लंडकडून एकूण 7 जणांनी बॉलिंग केली. मात्र त्या 7 पैकी 4 जणांनाच विकेट मिळाली. इंग्लंडसाठी जॅक लीच याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर मॅथ्यू पॉट्स, ब्रायडन कार्स आणि शोएब बशीर या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कर्णधार), सैम अयुब, अब्दुल्ला शफीक, कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, नोमान अली, साजिद खान आणि जाहिद महमूद.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), मॅथ्यू पॉट्स, ब्रायडन कार्स, जॅक लीच आणि शोएब बशीर.