Video : कामरान गुलामच्या फलंदाजीने इंग्लंडचा संघ वैतागला, बेन स्टोक्सने हिंदीत दिल्या शिव्या?

| Updated on: Oct 15, 2024 | 6:22 PM

पाकिस्तान इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या दिवशी पाकिस्तानचा वरचष्मा दिसला. सईम अयुब आणि कामरान गुलामने चांगली खेळी केली. तसेच इंग्लंडच्या गोलंदाजांना अडचणीत आणलं. यामुळे इंग्लंड संघाचा संताप झाला होता. इतकंच काय तर बेन स्टोक्सनेही संयम सोडल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

Video : कामरान गुलामच्या फलंदाजीने इंग्लंडचा संघ वैतागला, बेन स्टोक्सने हिंदीत दिल्या शिव्या?
Image Credit source: PTI
Follow us on

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना मुल्तानमध्ये सुरु आहे. या सामन्यात पाकिस्तानच्या संघात बरेच बदल करण्यात आले आहेत. बाबर आझमच्या जागी संघात कामरान गुलामला संधी देण्यात आली आहे. कामरान गुलामने पहिल्याच सामन्यात आपली छाप सोडली आहे. डेब्यू सामन्यातच पहिल शतक ठोकलं आहे. त्याने आपल्या फलंदाजीने इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलंच अडचणीत आणलं. त्याने सावधपणे इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना केला. त्यामुळे इंग्लंडचे गोलंदाज चांगलेच वैतागलेले दिसले. त्याची विकेट घेण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरल्याचं दिसत होतं. असं असताना इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स खूपच रागात दिसला. बेन स्टोक्सची एक प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. या व्हिडीओत बेन स्टोक्स कामरान गुलामच्या फलंदाजीमुळे चांगलाच वैतागलेला दिसला.

बेन स्टोक्सच्या व्हायरल व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया आल्या आहेत. काही क्रीडारसिकांनी दावा केला आहे की, बेन स्टोक्स हिंदीत शिव्या देत आहे. पण हा व्हिडीओ पाहून त्याबाबतचा अंदाज लावणं कठीण आहे. नुकताच असाच एक व्हिडीओ पहिल्या कसोटी सामन्यापूर्वीही समोर आला होता. त्यात शाहीन आफ्रिदी बाबर आझमला झिम्बू बोलत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र त्या व्हिडीओलाही आवाज नव्हता त्यामुळे त्याबाबत सांगणं कठीण आहे.

कामरान गुलामने पाकिस्तानसाठी फक्त एक वनडे सामना खेळला आहे. 2023 मध्ये वनडे संघाचा भाग होता. तेव्हा हारिस सोहेलच्या जागी सब्स्टिट्यूट म्हणून घेतलं होतं. पण फलंदाजीसाठी संधी मिळाली नव्हती. यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची बॅट चांगलीच तळपलेली दिसली. त्यामुळे त्याची कसोटी संघात एन्ट्री झाली. कामरानने 224 चेंडूंचा सामना केला आणि 11 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 118 धावा केल्या. दरम्यान, पाकिस्तानने पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 5 गडी गमवून 259 धावा केल्या आहेत. दिवसखेर मोहम्मद रिझवान नाबाद 37, तर आघा सलमान नाबाद 5 धावांवर खेळत आहे.