PAK vs ENG : पाकिस्तानचा मायदेशात शानदार मालिका विजय, इंग्लंडचा 9 विकेट्सने धुव्वा, साजीद आणि नोमानचा धमाका

Sajid Khan and Noman Ali : साजीद खान आणि नोमान अली या जोडीने कारनामा केला. पाकिस्तानच्या फिरकी जोडीने इंग्लंडच्या 20 पैकी 19 विकेट्स घेतल्या. या फिरकी जोडीने पाकिस्तानला मालिका विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली.

PAK vs ENG : पाकिस्तानचा मायदेशात शानदार मालिका विजय, इंग्लंडचा 9 विकेट्सने धुव्वा, साजीद आणि नोमानचा धमाका
pakistan won home series by 2 1 against englandImage Credit source: Pakistan Cricket X Account
Follow us
| Updated on: Oct 26, 2024 | 3:22 PM

पाकिस्तान इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेतील सलामीचा सामना वाईट पद्धतीने गमावला होता. पहिल्या डावात 550 धावा करुनही पाकिस्तानला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे पाकिस्तान 3 सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर पडली होती. मात्र पाकिस्तानने तिथून उठून धमाका केला आणि कमबॅक करत चक्क मालिका जिंकण्याचा कारनामा केला. पाकिस्तानने तब्बल 3 वर्षांची प्रतिक्षा संपवत मायदेशात कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे. पाकिस्तानला तिसर्‍या आणि अंतिम कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये विजयासाठी 36 धावांचं आव्हान मिळालं होतं. पाकिस्तानने हे आव्हान 3.1 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून पूर्ण केलं. पाकिस्तानने 37 धावा केल्या आणि सामना जिंकला. पाकिस्तानने यासह इंग्लंडचा 9 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. पाकिस्तानने अशाप्रकारे 3 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे.

साजीद आणि नोमानचा धमाका

साजीद खान आणि नोमान अली ही जोडी पाकिस्तानच्या विजयाची शिल्पकार ठरली. या दोघांनी 20 पैकी 19 विकेट्स घेतल्या. साजीदने पहिल्या डावात 6 आणि दुसऱ्या डावात 4 अशा एकूण 10 विकेट्स घेतल्या. तर नोमान अली याने पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 6 अशा एकूण 9 विकेट्स घेतल्या.

सामन्याचा धावता आढावा

इंग्लंडने नाणेफेक जिंकत पहिल्या डावात ऑलआऊट 267 धावा केल्या. पाकिस्तानने प्रत्युत्तरात 344 धावा केल्या. त्यानंतर पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडला दुसऱ्या डावात 112 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे पाकिस्तानला 36 धावांचं माफक आव्हान मिळालं. पाकिस्तानने हे आव्हान 19 बॉलमध्ये 1 विकेट गमावून विजय मिळवला आणि मालिकेवर नाव कोरलं.

पाकिस्तानचा मालिका विजय

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : सैम अयुब, अब्दुल्ला शफीक, शान मसूद (कर्णधार), कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, नोमान अली, साजिद खान, जाहिद महमूद

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन : बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), गस ऍटकिन्सन, रेहान अहमद, जॅक लीच आणि शोएब बशीर.

Non Stop LIVE Update
'अतिशय हिन, गलिच्छ भाषेत माझ्या मुलीवर...,' काय म्हणाले थोरात ?
'अतिशय हिन, गलिच्छ भाषेत माझ्या मुलीवर...,' काय म्हणाले थोरात ?.
वसंत देशमुख यांच्यावर कठोर कारवाई होणार? पोलीस अधिक्षक काय म्हणाले?
वसंत देशमुख यांच्यावर कठोर कारवाई होणार? पोलीस अधिक्षक काय म्हणाले?.
थोरात आणि विखे समर्थकांच्या संगमनेरमधील राड्याची केंद्राकडून दखल
थोरात आणि विखे समर्थकांच्या संगमनेरमधील राड्याची केंद्राकडून दखल.
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्यं अतिशय किळसवाणं - रोहित पाटील
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्यं अतिशय किळसवाणं - रोहित पाटील.
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्याची महिला आयोगाकडून दखल, गुन्हा दाखल
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्याची महिला आयोगाकडून दखल, गुन्हा दाखल.
'महिलांचा मानसन्मान न राखणाऱ्यांना...,'काय म्हणाल्या जयश्री थोरात
'महिलांचा मानसन्मान न राखणाऱ्यांना...,'काय म्हणाल्या जयश्री थोरात.
कॉंग्रेसची 23 जणांची दुसरी यादी जाहीर, कुणाला संधी-कुणाचा पत्ता कट ?
कॉंग्रेसची 23 जणांची दुसरी यादी जाहीर, कुणाला संधी-कुणाचा पत्ता कट ?.
मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, काय झाली चर्चा ?
मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, काय झाली चर्चा ?.
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा.
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा.