पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांची दमछाक, इंग्लंडसमोर पाटा विकेटवर गोलंदाजी करणंच विसरले! काय झालं वाचा

| Updated on: Oct 09, 2024 | 6:52 PM

इंग्लंड पाकिस्तान कसोटी सामन्यातील तिसरा दिवस जो रूट आणि हॅरी ब्रूकने गाजवला. या दोघांनी 243 धावांची भागीदारी केली. तसेच पाकिस्तान गोलंदाजांचं कंबरडं मोडलं. इंग्लंडला कोंडीत पकडण्यासाठी तयार केलेलं पाटा विकेट पाकिस्तानच्या अंगाशी आलं. पहिल्या डावात 556 धावा करूनही पाकिस्तानची बोलती बंद झाली आहे.

पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांची दमछाक, इंग्लंडसमोर पाटा विकेटवर गोलंदाजी करणंच विसरले! काय झालं वाचा
Image Credit source: AFP
Follow us on

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना मुल्तान येथे सुरु आहे. मात्र या सामन्याच्या पहिल्या दिवसापासून वादाला तोंड फुटलं आहे. पाटा विकेट पाहून माजी खेळाडूंना टीका केली आहे. पाकिस्तानने विकेटचा अंदाज घेऊन नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली. तसेच पहिल्या डावात सर्व गडी बाद 556 धावांचा डोंगर उभा केला. पण पाकिस्तानची खेळी पाकिस्तानच्या अंगाशी आल्याचं दिसत आहे. कारण इंग्लंडने पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर दिलं आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 3 गडी गमवून 492 धावा केल्या आहेत. अजूनही पाकिस्तानकडे 64 धावांची आघाडी आहे. मात्र इंग्लंडचा खेळ पाहून हे सहज शक्य होईल असं वाटत आहे. इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानचे गोलंदाज गोलंदाजी करणं विसरून गेले असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. पाकिस्तानी गोलंदाजाचा स्पीड कुठे तरी हरवल्याचं दिसून आलं. मुल्तान कसोटीत पाकिस्तानचा संघ तीन वेगवान गोलंदाजांसह उतरला आहे. यात दिग्गज शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि आमिर जमाल यांचा समावेश आहे. वेगवान गोलंदाजांचा स्पीड पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

मुल्तान कसोटीत शाहीन आफ्रिदीने सर्वात वेगवान चेंडू हा 138.9 किमी प्रतितासाने फेकला. त्याचा गोलंदाजीची सरासरी 134.1 इतकी होती. तर नसीम शाहने 141.6 च्या सरासरीने सर्वात वेगाने चेंडू टाकला खरा पण त्याची सरासरी गोलंदाजीचा स्पीड हा 136 किमी प्रतितास इतका होता. अमीर जमालने सर्वात वेगाने टाकलेला चेंडू हा 137.9 किमी प्रतितास इतका होता. पण सरासरी वेग हा 131 इतका होता. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांची स्पीड हा 140 वरच पाहिला गेला आहे. मात्र या सामन्यात तसं काही दिसलं नाही. त्यामुळे पाकिस्तानी फॅन्सनी गोलंदाजांची फिरकी घेत फिरकीपटू म्हणून उल्लेख केला आहे.

पाकिस्तानी गोलंदाज फक्त वेगच नाही तर अचूक टप्पा करणंही विसरल्याचं दिसू आलं. त्यामुळे इंग्लंडची विकेट घेणं कठीण झालं. कसोटी या शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि आमिर जमाल यांचा 5 चा इकोनॉमी रेट होता. म्हणजेच फलंदाजांना अडचणीत आणणं या गोलंदाजांना कठीण गेलं. तिसऱ्या दिवसअखेर हॅरी ब्रूकने नाबाद 141 धावा, तर जो रूटने नाबाद 176 धावांची खेळी केली आहे.