PAK vs ENG 3rd Test : इंग्लंडनंतर पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन जाहीर, कुणाला संधी?
Pakistan vs England 3rd Test Playing 11: इंग्लंडनंतर पाकिस्ताननेही तिसऱ्या आणि अंतिम सामन्यासाठी काही तासांआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर करत सामन्यासाठी सज्ज असल्याचं स्पष्ट केलंय. उभयसंघातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे.
पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यात सध्या 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यासाठी इंग्लंडनंतर आता यजमान पाकिस्तानने सामन्यांच्या काही तासांआधीच प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. उभयसंघातील हा तिसरा आणि अंतिम सामना 24 ऑक्टोरबरपासून रावळपिंडी येथे खेळवण्यात येणार आहे. ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा सामना हा निर्णायक असणार आहे. तसेच दोन्ही संघामध्ये मालिका जिंकण्यासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. अशात आता सामन्यासह कोण मालिका जिंकणार? याकडे लक्ष असणार आहे.
कॅप्टन शान मसूद याने तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पाकिस्तानने दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधली होती. त्यामुळे विजयी संघाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल न होण्याची शक्यता होती. त्यानुसारच कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पाकिस्तानचा पहिल्या सामन्यात लाजीरवाणा पराभव झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात बाबर आझम याच्या जागी कामरान गुलाम याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. कामरानने या संधीचं सोन करत पदार्पणातच शतक ठोकलं. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यातही कामरानचं स्थान कायम आहे.
3 स्पिनर्सचा समावेश
पाकिस्तानच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये 3 स्पिनर्सचा समावेश आहे. यामध्ये साजिद खान, नोमान अली आणि जाहिद महमूद या त्रिुकटाचा समावेश आहे. साजिद खान आणि नोमान अली या जोडीनेच दुसऱ्या सामन्यात इंग्लंडला दोन्ही डावात गुंडाळलेलं. साजिदने 9 तर नोमाने 11 विकेट्स घेतल्या होत्या. या घातक जोडीच्या मदतीला जाहिद महमूद असणार आहे.
दरम्यान इंग्लंडने मंगळवारी 22 ऑक्टोबरला प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली. इंग्लंडने पराभवानंतर 2 बदल केले. गस एटकिन्सन आणि रेहान अहमद या दोघांचं कमबॅक झालं आहे. तर मॅथ्यू पॉट्स आणि ब्रायडन कार्स या दोघांना डच्चू देण्यात आला आहे.
पाकिस्तानची अनचेंज प्लेइंग ईलेव्हन
The men’s national selection committee has confirmed Pakistan’s playing XI for the third Test against England, starting in Rawalpindi on Thursday, 24 October.#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/bkXGNhXYBu
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 23, 2024
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कॅप्टन), अब्दुला शफीक, कामरान गुलाम, सऊद शकील, मोहम्मद रिजवान, सलमान अली आगा, आमेर जमाल, नोमाल अली, साजिद खान आणि जाहिद महमूद.
अंतिम कसोटी सामन्यासाठी इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जॅमी स्मिथ (विकेटकीपर), गस एटकिन्सन, रेहान अहमद, जॅक लीच आणि शोएब बशीर.