PAK vs IND | ईशान-हार्दिकची झुंजार खेळी, पाकिस्तानला विजयासाठी 267 धावांचं आव्हान

pakistan vs india asia cup 2023 | टीम इंडियाच्या हार्दिक पंड्या आणि ईशान किशन या जोडीने केलेल्या भागीदारीने लाज राखली. या दोघांनी केलेल्या शतकी भागीदारीमुळे टीम इंडियाने पाकिस्तानला 267 धावांचं आव्हान दिलंय.

PAK vs IND | ईशान-हार्दिकची झुंजार खेळी, पाकिस्तानला विजयासाठी 267 धावांचं आव्हान
Follow us
| Updated on: Sep 02, 2023 | 8:21 PM

पल्लेकेले | उपकर्णधार हार्दिक पंड्या आणि विकेटकीपर ईशान किशन या दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने आशिया कपमधील तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी 267 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने 48.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 266 धावा केल्या. त्यामुळे आता टीम इंडियाचे गोलंदाज पाकिस्तानला या धावा करण्यापासून रोखणार का, याकडे भारतीय समर्थकांचं लक्ष असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान हा सामना जिंकून सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.

टॉप ऑर्डर फ्लॉप

टॉस जिंकून बॅटिंगसाठी आलेल्या टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरची घसरगुंडी झाली. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला झटपट 4 झटके देत बॅकफुटवर ढकललं. रोहित शर्मा 11, विराट कोहली 4, श्रेयस अय्यर 14 आणि शुबमन गिल 10 धावा करुन आऊट झाला. त्यामुळे टीम इंडियाची 14.1 ओव्हरमध्ये 4 बाद 66 अशी नाजूक स्थिती झाली. पाकिस्तानने पूर्णपणे सामन्यावर घट्ट पकड मिळवली.

हे सुद्धा वाचा

हार्दिक-ईशानची शतकी भागीदारी

आता टीम इंडियाला मोठ्या भागीदारीची गरज होती. टीम इंडियाला बॅकफुटवरुन बाहेर काढण्याची जबाबदारी ही उपकर्णधार हार्दिक पंड्या आणि पाकिस्तान विरुद्ध पहिल्यांदाच खेळणाऱ्या ईशान किशन या दोघांनी घेतली. या दोघांनी सावकाश सुरुवात करत गिअर बदलत टीमला चांगल्या स्थितीत आणलं. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी केली.

हार्दिक पंड्या आणि ईशान किशन या दोघांनी अर्धशतकं ठोकली. दोघांनाही शतकाची संधी होती. मात्र तसं होऊ शकलं नाही. हरीस रौफ याने ही जोडी फोडली. ईशान 82 धावांवर आऊट झाला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 142 बॉलमध्ये 138 धावांची निर्णायक पार्टनरशीप केली. ईशान आऊट झाल्यानंतर हार्दिकने गिअर बदलला आणि फटेक मारायला सुरुवात केली. मात्र हार्दिकही शतकापासून चुकला. हार्दिकने 90 बॉलमध्ये 87 धावा केल्या.

टीम इंडिया 50 ओव्हर खेळण्यात अपयशी

त्यानंतर ऑलराउंडर असलेल्या रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकुर या दोघांनी निराशा केली. जडेजा 14 आणि ठाकुर 3 धावा करुन माघारी परतले. कुलदीप यादव याने 4 धावा केल्या. तर 13 महिन्यांनी वनडेत कमबॅक करणाऱ्या जसप्रीत बुमराह याने निर्णायक 16 धावांची खेळी केली. तर मोहम्मद सिराज 1 धावेवर नाबाद परतला.

पाकिस्तानची पेसरची धमाल

दरम्यान पाकिस्तानच्या पेसर्स अर्थात वेगवान गोलंदाजांनीच सर्वच्या सर्व 10 विकेट्स घेतल्या. शाहीन अफ्रिदी याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर नसीम शाह आणि हरीस रऊफ या दोघांच्या खात्यात प्रत्येकी 3-3 विकेट्स गेल्या.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन | बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हारिस रऊफ.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.