PAK vs IND, Asia Cup 2023 | टीम इंडियाने टॉस जिंकला, पाकिस्तान विरुद्ध अशी आहे प्लेईंग इलेव्हन
Pakistan vs India Asia Cup 2023 | पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील आशिया कप 2023 मधील तिसऱ्या सामन्याला भारतीय वेळेनुसार 3 वाजता सुरुवात होणार आहे.
पल्लेकेले | आशिया कप 2023 स्पर्धेतील तिसरा सामना हा हायव्होल्टेज असा आहे. तिसरा सामन्यात ए ग्रुपमधील 2 कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने आहेत. पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यात महामुकाबला होणार आहे. या साम्न्याचं आयोजन हे श्रीलंकेतील कँडी शहरामधील पल्लेकेले स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. टीम इंडियाने टॉस जिंकला आहे. टीम इंडियानेटॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
ओपनिंग जोडी कोण?
टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही जोडी ओपनिंग करणार आहे. या दोघांनी आतापर्यंत अनेकदा टीम इंडियासाठी ओपनिंग केली आहे. त्यामुळे या दोघांमध्ये जबरदस्त तालमेल आहे. या जोडीवर टीम इंडियाला चांगली सुरुवात करुन देण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे हे दोघे पाकिस्तानच्या भेदक माऱ्याचा कसा सामना करतात, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.
टीम इंडियात दोघांचं कमबॅक
कॅप्टन रोहित शर्मा याने प्लेईंग इलेव्हनमध्ये विकेटकीपर म्हणून ईशान किशन याला संधी दिली आहे. तर श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह या दोघांचं अनेक महिन्यांनी टीममध्ये कमबॅक झालं आहे. श्रेयसला संधी दिल्याने सूर्यकुमार यादव याला बाहेर बसावं लागलं आहे. तर स्पिनर म्हणून कुलदीप यादव याला संधी मिळाली आहे. सामन्याआधी रोहित शर्मा कुलदीप ऐवजी ऑलराउंड ऑप्शन म्हणून अक्षर पटेल याला संधी देईल, असं म्हटलं जात होतं. मात्र रोहितने कुलदीपवर विश्वास दाखवला आहे.
टीम इंडियाचा 50 वा सामना
टीम इंडियाचा आशिया कपमधील हा 50 सामना आहे. टीम इंडियाने आतापर्यंत 49 सामन्यात दमदार कामगिरी केली आहे. टीम इंडियानेच आतापर्यंत सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकण्याचा कारनामा केला आहे.
टीम इंडियाचे अंतिम 11 शिलेदार
🚨 Toss & Team Update 🚨
Captain @ImRo45 has won the toss & #TeamIndia have elected to bat against Pakistan. #INDvPAK
A look at our Playing XI 🔽
Follow the match ▶️ https://t.co/hPVV0wT83S#AsiaCup2023 pic.twitter.com/onUyEVBwvA
— BCCI (@BCCI) September 2, 2023
पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन | बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हारिस रऊफ.
आशिया कप 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.