PAK vs IND Rain | टीम इंडिया-पाकिस्तान सामन्यात पावसाने ‘खेळ मांडला’, गेम थांबला

india vs pakistan super 4 match stopped due to rain | पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया सामना सुरु होण्याआधी आर प्रेमदासा स्टेडियम आणि आसपासच्या भागात कडकडीत उन पडलं होतं. मात्र आता पावसाने एन्ट्री घेतलीय. त्यामुळे सामना थांबवण्यात आलाय.

PAK vs IND Rain | टीम इंडिया-पाकिस्तान सामन्यात पावसाने 'खेळ मांडला', गेम थांबला
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 6:11 PM

कोलंबो | पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यात सुपर 4 मधील तिसरा सामना खेळवण्यात येत आहे. पाकिस्तानने टीम इंडियाला टॉस जिंकून बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. टीम इंडियाच्या रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने धमाकेदार सुरुवात मिळवून दिली. दोघांनी शतकी भागीदारी केली. शुबमन आणि रोहित या दोघांनी अर्धशतकं झळकावली. त्यानंतर ही सलामी जोडी आऊट झाली. आता केएल राहुल आणि विराट कोहली खेळत आहेत. या दरम्यान सामन्यात पावसाने खोडा घातलाय. पावसामुळे सामना थांबवण्यात आला आहे.

रोहित-शुबमनची शतकी सलामी भागीदारी

रोहित आणि शुबमन या दोघांनी 121 रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केली. मात्र ही जोडी अखेर शादाब खान या फोडली. रोहित शर्मा याला शादाबने आऊट केलं. रोहितने 49 बॉलमध्ये 6 चौकार आणि 4 सिक्ससह 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. रोहितचं हे वनडेतील अर्धशतकांचं अर्धशतक ठरलं. रोहितनंतर दुसऱ्याच ओव्हरमध्ये शुबमन गिल आऊट झाला. शुबमनने 52 बॉलमध्ये 10 चौकारांच्या मदतीने 58 धावांची खेळी केली. रोहित शुबमन टीम इंडियाची ओपनिंग जोडी माघारी गेली. त्यामुळे टीम इंडियाचा 17.5 ओव्हरमध्ये 2 बाद 123 असा स्कोअर झाला.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहली या दोघांनी टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान दोघांनी सिंगल-डबल रन घेत स्कोअरकार्ड हलता ठेवला. टीम इंडियाच्या डावातील ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. शादाब खान 25 वी आणि त्याच्या स्पेलमधील सातवी ओव्हर टाकायला आला. ओव्हरमधील पहिला बॉल टाकला. विराट 8 आणि केएल 17 धावांवर खेळत होते. तितक्यात एकच धावाधाव सुरु झाली.

कोलंबोत मुसळधार पाऊस

धावाधाव सुरु झाल्याने नक्की काय झालं कळालं नाही. क्रिकेट चाहते हे आडोशाला जाऊ लागले कारण पावसाची एन्ट्री झाली. अचानक पाऊस आल्याने ग्राउंड स्टाफची एकच धावाधाव झाली. ग्राउंड स्टाफ धावत धावत कव्हर घेऊन मैदानात आले. खेळपट्टी झाकली.

दरम्यान गेल्या एका तासापासून पावसामुळे खेळ खोलंबला आहे. सामन्यात साधारण 4 वाजून 50 मिनिटांदरम्यान पावसाने एन्ट्री घेतली. आता 40-50 मिनिटांनंतर पाऊस थांबला आहे. त्यामुळे आता सामन्याला किती वाजता सुरुवात होते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रउफ.

हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.