Asia Cup 2023 | पाकिस्तान क्रिकेट टीमचा रेकॉर्ड, आशिया कपमध्ये ऐतिहासिक कामगिरी
asia cup 2023 pakistan vs india | क्रिकेट चाहते भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी सर्व कामं सोडून सज्ज होते. मात्र पावसाने खेळखंडोबा केला आणि सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पल्लेकेले | पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील आशिया कप 2023 मधील मोठा सामना हा पावसामुळे नाईलाजाने रद्द करावा लागलाय. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला विजयासाठी 267 रन्सचं टार्गेट दिलं. मात्र पाऊस झाल्याने दुसऱ्या डावाला सुरुवातच होऊ शकली नाही. त्यामुळे पावसाचाच विजय झाला. सामना रद्द झाल्याने पाकिस्तान आणि टीम इंडिया दोन्ही संघांना 1-1 गुण मिळालाय. पाकिस्तानने या 1 पॉइंट्ससह सुपर 4 मध्ये धडक दिली आहे. पाकिस्तान सुपर 4 मध्ये पोहचणारी पहिली टीम ठरलीय. पाकिस्तानने या सामन्यात मोठा रेकॉर्ड केला आहे.
नक्की रेकॉर्ड काय?
टीम इंडियाने टॉस जिंकला. बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र पाकिस्तानच्या बॉलिंगसमोर टीम इंडियाला पूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. पाकिस्तानने टीम इंडियाला 48.5 ओव्हरमध्ये 266 धावांवर ऑलआऊट केलं. टीम इंडियाची अतिशय वाईट सुरुवात झाली. झटपट 4 विकेट्स गमावल्या. मात्र त्यानंतर ईशान किशन आणि हार्दिक पंड्या या दोघांनी शतकी भागीदारी केली. तसेच वैयक्तिक अर्धशतकं ठोकली.
त्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सामन्यात कमबॅक केलं आणि टीम इंडियाला ऑलआऊट केलं. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनीच सर्वच्या सर्व 10 विकेट्स घेतल्या. शाहिन अफ्रिदी याने 10 ओव्हरमध्ये 35 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या. तर नसीम शाह याने 8.5 ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेतल्या. तर हरीस रऊफ याने 58 धावा देऊन 3 जणांना मैदानाबाहरेचा रस्ता दाखवला. पाकिस्तानने यासोबतच आशिया कप इतिहासातील सर्वात मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला.
पाकिस्तानची अफलातून कामगिरी
First time in Asia Cup (ODI) history that all 10 wickets have been taken by pacers 🎯
Quality stuff by @iShaheenAfridi, @iNaseemShah and @HarisRauf14 ☄️#PAKvIND | #AsiaCup2023 pic.twitter.com/sThyT8ckef
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 2, 2023
पाकिस्तान वेगवान गोलंदांजाच्या आधारावर आशिया कपमध्ये 10 विकेट्स घेणारी पहिली टीम ठरली आहे. आशिया कप इतिहासात ही पहिलीच वेळ ठरली आहे. पाकिस्तानने या सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये 3 फिरकी ऑलराउंडर्सचा समावेश केला होता. या तिघांमध्ये शादाब खान, मोहम्मद नवाज आणि सलमान अली यांचा समावेश होता. मात्र या तिघांना एकही विकेट घेता आली नाही.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन | बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हारिस रऊफ.