PAK vs IND | टीम इंडिया विरुद्धच्या मॅचसाठी पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हनची घोषणा, कुणाला संधी?
Pakistan Playing 11 Against Team India Super 4 Match | पाकिस्तानने टीम इंडिया विरुद्धच्या सुपर 4 मधील महामुकाबल्याआधी आपली प्लेईंग ईलेव्हन जाहीर केली आहे. पाहा टीममध्ये कोण कोण आहेत?
कोलंबो | आशिया कप 2023 सुपर 4 राउंडमधील तिसरा सामना हा 10 सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे श्रीलंकेची राजधानी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं कर्णधारपद सांभाळणार आहे. तर बाबर आझम याच्याकडे पाकिस्तानची सूत्रं आहेत. या सामन्याला अजून काही तास शिल्लक आहेत. त्याआधीच पाकिस्तान क्रिकेट टीमने प्लेईंग ईलेव्हन जाहीर केली आहे.
पाकिस्तानने प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पाकिस्तानने बांगलादेश विरुद्धच्या सुपर 4 मधील पहिल्या सामन्यातील प्लेईंग ईलेव्हन कायम ठेवली आहे. पाकिस्तान एकूण 4 वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरणार आहे. कॅप्टन बाबरने स्पिन ऑलराउंडर मोहम्मद नवाझ याला संधी दिलेली नाही. त्याजागी बॉलिंग ऑलराउंडर फहीम अश्रफ याच्यावरच विश्वास दाखवत त्याला कायम ठेवलंय.
पाकिस्तानचे बॉलर
शाहीन शाह आफ्रिदी , नसीम शाह, हरिस रऊफ आणि फहीम अश्रफ या चौघांच्या खांद्यावर पाकिस्तानच्या बॉलिंगची जबाबदारी असणार आहे. तर शादाब खान हा लीड स्पीनरच्या भूमिका आहे. सलमान आघा आणि इफ्तिखार अहमद हे दोघे शादाब खान याला साथ देतील.
टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यासाठी बाबरसेना
Our playing XI for the #PAKvIND match 🇵🇰#AsiaCup2023 pic.twitter.com/K25PXbLnYe
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 9, 2023
टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), फहीम अशरफ, नसीम शाह, शाहीन शाह अफ्रीदी आणि हारिस रऊफ.
आशिया कप 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.