PAK vs IND | टीम इंडियात सुपर 4 साठी मोठे बदल! पाकिस्तान विरुद्ध प्लेईंग इलेव्हनमधून तिघांना डच्चू
Pakistan vs India Super 4 Asia Cup 2023 | पाकिस्तान विरुद्धच्या सुपर 4 मधील पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियात कॅप्टन रोहित शर्मा प्लेईंग ईलेव्हनमध्ये 3 बदल करण्याच्या तयारीत आहे. कोण आहेत ते तिघे खेळाडू? जाणून घ्या .
कोलंबो | आशिया कप 2023 सुपर 4 मधील दुसऱ्या सामन्यात श्रीलंका विरुद्ध बांगलादेश आमनेसामने आहेत. मात्र क्रिकेट विश्वाचं लक्ष हे रविवारी 10 सप्टेंबरला होणाऱ्या महामुकाबल्याकडे लागलं आहे. पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया सुपर 4 मधील तिसऱ्या सामन्यात भिडणार आहेत. टीम इंडियाचा सुपर 4 मधील हा पहिला सामना असणार आहे. तर पाकिस्तानची दुसरी मॅच असणार आहे. हा महामुकाबला श्रीलंकेतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
पाकिस्तान-टीम इंडियाची या स्पर्धेतील एकमेकांविरुद्ध खेळण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. त्याआधी 2 सप्टेंबरला दोन्ही संघ आमनेसामने होते. मात्र पावसामुळे सामना रद्द झाला होता. पाकिस्तानने सुपर 4 मधील पहिला सामना हा बांगलादेश विरुद्ध 7 विकेट्सने जिंकलाय. त्यामुळे पाकिस्तानचा टीम इंडिया विरुद्ध जिंकून फायनलचा दावा आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियात या हायव्होल्टेज सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये तब्बल 3 बदल करण्याच्या तयारीत आहेत.
कुणाला संधी कुणाला डच्चू?
पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्याआधी टीम इंडियाचे 2 दिग्गजांचं कमबॅक झालंय. जसप्रीत बुमराह हा आपल्या मुलाच्या जन्मानिमित्ताने भारतात परतला होता. त्यामुळे नेपाळ विरुद्धच्या सामन्यात तो खेळला नव्हता. त्याच्या जागी टीममध्ये मोहम्मद शमी याला संधी दिली होती. तर केएल राहुल याचंही कमबॅक झालंय. केएल फीट नसल्याने तो पाकिस्तान आणि नेपाळ विरुद्ध खेळला नव्हता. मात्र तो आता 2 दिवसांपूर्वी कोलंबोत दाखल झाला आहे. पहिल्या 2 सामन्यात विकेटकीपर म्हणून ईशान किशन याला संधी देण्यात आली.
बुमराह आणि केएल आता दोघेही परतले. दोघेही खेळण्यासाठी सज्ज आहेत. दोघांनीही जोरदार सराव केलाय. त्यामुळे बुमराह प्लेईंग ईलेव्हनमध्ये खेळणार असल्याचं निश्चित आहे. त्यामुळे शमीला बाहेर पडावं लागेल. तर ईशानच्या जागी केएलला संधी मिळू शकते. आता तिसरा खेळाडू कोण, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर तो तिसरा बॅट्समन आहे श्रेयस अय्यर. श्रेयसला साखळी फेरीतील पाकिस्तान आणि नेपाळ विरुद्ध संधी दिली. मात्र त्याला आपली छाप सोडता आली नाही. त्यामुळे श्रेयसच्या जागी टीममध्ये सूर्याला संधी देण्यात येऊ शकते.
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया संभावित प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.