PAK vs NED | नेदरलँड्सने झुंजवलं पण पाकिस्तानचा 81 धावांनी विजय
Icc World Cup 2023 2nd Match Pakistan vs Netherlands Result | लिंबुटिंबु समजल्या जाणाऱ्या नेदरलँड्स क्रिकेट टीमने पाकिस्तानच्या बॅटिंग आणि बॉलिंगची चांगलीच परीक्षा घेतली. मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही.
हैदराबाद | पाकिस्तान क्रिकेट टीमने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये विजयी सलामी दिली आहे. पाकिस्तानने नेदरलँड्सवर 81 धावांनी विजय मिळवला आहे. पाकिस्तानने नेदरलँड्ससमोर 287 धावांचं आव्हान ठेवलं होतं. नेदरलँड्सच्या फलंदाजानीही पाकिस्तान विरुद्ध चांगली फाईट दिली. नेदरलँड्सला विजय मिळवण्यात अपयश आलं. मात्र नेदरलँड्सने सामना एकतर्फी होऊ दिला नाही. नेदरलँड्सने 41 ओव्हरमध्ये ऑलआऊट 205 धावा केल्या. नेदरलँड्सकडून दोघांनी अर्धशतकी खेळी केली. तर पाकिस्तानकडून हरिस रौफ याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
नेदरलँड्सची कडवट झुंज
नेदरलँड्सकडून बास दी लिडे याने सर्वाधिक 67 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर ओपनर विक्रमजित सिंह याने 52 रन्सचं योगदान दिलं. लोगान विक बिक याने 28 बॉलमध्ये 28 नाबाद धावा केल्या. कॉलिन अकरमन याने 17 धावा जोडल्या. साकिब झुल्फिकर याने 10 रन्स केल्या. कॅप्टन स्कॉट एडवर्ड्स याला भोपळाही फोडता आला नाही. तर उर्वरित 5 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
पाकिस्तानकडून हरीस रौफ याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. हसन अली याने 2 विकेट्स घेत हरीस रौफ याला चांगली साथ दिली. तर शाहिन आफ्रिदी, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाझ आणि शादाब खान या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेत नेदरलँड्सला ऑलआऊट केलं.
पाकिस्तानची विजयी सुरुवात
Netherlands showed great spirit but Pakistan’s bowling carried the day in the #CWC23 clash in Hyderabad ⚡#PAKvNED
Details 👇https://t.co/L5fyvkhjRg
— ICC (@ICC) October 6, 2023
नेदरलँड्सची बॉलिंग
त्याआधी नेदरलँड्सने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पाकिस्तानला नेदरलँड्समोर 50 ओव्हरही खेळता आलं नाही. पाकिस्तानने 49 ओव्हरमध्ये 286 धावा केल्या. पाकिस्तानकडून रिझवान आणि सौद शकील या दोघांनी प्रत्येकी 68 धावा केल्या. तर नेदरलँड्सकडून बास डी लिडे याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), इमाम उल हक, फखर जमान, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.
नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि विकेटकीपर), विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, साकिब झुल्फिकार, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन.