PAK vs NED Live Streaming | पाकिस्तान नेदरलँड्स विरुद्ध कमबॅक करणार? सामना कधी आणि कुठे पाहता येणार?
Pakistan vs Netherlands ICC world Cup 2023 Live Streaming | पाकिस्तान विरुद्ध नेदरलंड्स या दोन्ही संघातील सामना कुठे आणि कधी पाहता येणार? कोणत्या चॅनेलवर दिसणार, एका क्लिकवर जाणून घ्या.
हैदराबाद | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पहिला सामना न्यूझीलंडने 9 विकेट्सने जिंकला. न्यूझीलंडने इंग्लंडला लोळवत विजयी सुरुवात केली. आता स्पर्धेतील दुसरा सामना हा पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात होणार आहे. पाकिस्तान आणि नेदरलँड्स या दोन्ही संघाचा यंदाच्या वर्ल्ड कपमधील पहिलाच सामना आहे. नेदरलँड्सने 12 वर्षांनंतर वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय केलंय. त्यामुळे नेदरलँड्स टीम वर्ल्ड कपमध्ये सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. बाबर आझम हा पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर स्कॉट एडवर्ड्स याच्याकडे नेदरलँड्सं कर्णधारपद आहे. हा सामना कधी आहे, कुठे पाहता येणार हे आपण जाणून घेऊयात.
पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स सामना केव्हा?
पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स सामना शुक्रवारी 6 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स सामना कोणत्या स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार?
पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स सामना हैदराबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?
पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स सामना टीव्हवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहायला मिळेल.
पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?
पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स सामना मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टारवर फुकटात पाहता येईल.
वर्ल्ड कपसाठी नेदरलँड्स क्रिकेट टीम | स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, विक्रम सिंग, तेजा निदामानुरु, पॉल व्हॅन मीकेरेन, कॉलिन अकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लेन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद आणि सायब्रँड एंजेलब्रेक्ट.
वनडे वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान टीम | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान, फखर जमान, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम.