Fakhar Zaman | फखर जमान याची न्यूझीलंड विरुद्ध दिग्गजांना पछाडत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी
न्यूझीलंड विरुद्ध रावलपिंडी इथे शनिवारी 29 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा सलामी फलंदाज फखर जमान याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
इस्लामाबाद | पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात शनिवारी 29 एप्रिल रोजी दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना खेळवण्यात आला. हा सामना हायस्कोअरिंग असा झाला. पाकिस्तानने या सामन्यात टॉस जिंकून न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. डेरेल मिचेल याने 129 धावांची शतकी खेळी केली. तर कॅप्टन टॉम लॅथम याने 98 आणि चॅड बोव्स याने 51 धावांची खेळी केली. या तिकडीने केलेल्या या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 336 धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानला विजयासाठी 337 धावांचं आव्हान मिळालं. पाकिस्तानला मजबूत आव्हान मिळाल्याने सामन्यात रंगत पाहायला मिळणार होती.मात्र पाकिस्तानने हा सामना सहज जिंकला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
पाकिस्तानने 337 रन्सचं टार्गेट 48.2 ओव्हरमध्ये 3 विकेट् गमावून या धावा पूर्ण केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद रिजवान याने 54 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. कॅप्टन बाबर आझम याने 65 रन्सचं योगदान दिलं. इमाम उल हक याने 24 आणि अब्दुल्लाह शफीक याने 7 रन्सचं योगदान दिलं. तर ओपनर फखर जमान हा पाकिस्तानसाठी हिरो आणि न्यूझीलंडसाठी शत्रू ठरला. फखरने पाकिस्तानकडून मोठी आणि विजयी खेळी साकारली. फखरने 144 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 17 चौकारांच्या मदतीने नाबाद 180 धावांची शतकी खेळी केली. फखर जमान याने वनडे कारकीर्दीतील आपलं 10 व शतकं पूर्ण केलं. फखरने या खेळीसह अनेक दिग्गजांना मागे टकत रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
वेगवान 3 हजार धावा
फखरने 180 धावांसह अनेक विक्रम प्रस्थापित केले. फखरने वनडे क्रिकेटमध्ये 3 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. फखर वनडेमध्ये वेगवान 3 हजार धावांचा टप्पा पार केला. फखर वनडे क्रिकेटमध्ये मोठा कारनामा केला. फखरने अवघ्या 67 डावांमध्ये 3 हजार पूर्ण केले. फखरने यासह विराट कोहली आणि बाबर आझम या दिग्ग्जांना मागे सोडलं. बाबर याने 68 तर विराटने 75 डावांमध्ये 3 हजार धावांचा पल्ला गाठला होता.
फखर जमान याचा कारनामा
Fakhar Zaman becomes the quickest Pakistani to 3000 runs in ODIs #PakvNZ #Cricket pic.twitter.com/6B0uUVU1gk
— Saj Sadiq (@SajSadiqCricket) April 29, 2023
वनडेत वेगवान 3 हजार धावांचा विक्रम हा दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू हाशिम आमला याच्या नावावर आहे. हाशिमने 57 डावात 3 हजार रन्स केल्या होत्या. अजूनही हा वर्ल्ड रेकॉर्ड हाशिम आमलाच्या नावावर आहे.इतकंत नाही, तर फखरचं हे सलग तिसरं एकदिवसीय शतक ठरलं. फखर वनडेमध्ये सलग 3 शतक ठोकणारा एकूण 12 वा आणि तिसरा पाकिस्तानी फलंदाज ठरला. फखरने केलेल्या नाबाद 180 धावांच्या खेळीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
दरम्यान पाकिस्तानने हा सामना जिंकत 5 मॅचच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या सीरिजमधील तिसरा आणि निर्णायक सामना हा बुधवारी 3 मे रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात जिंकून पाकिस्तानचा मालिका जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, मोहम्मद नवाज, उसामा मीर, नसीम शाह, हरिस रौफ आणि इहसानुल्ला.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन | टॉम लॅथम (कर्णधार आणि विकेटकीपर), चॅड बोव्स, विल यंग, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, हेन्री निकोल्स, जेम्स नीशम, रचिन रवींद्र, हेन्री शिपले, ईश सोधी आणि मॅट हेन्री.