PAK vs SL | मोहम्मद रिझवान-इफ्तिखार अहमद जोडीची निर्णायक खेळी, श्रीलंकेला 253 रन्सचं टार्गेट

Pakistan vs Sri Lanka Super 4 Asia Cup 2023 | अब्दुल्लाह शफीक, मोहम्मद रिझवान आणि इफ्तिखार अहमद या तिघांनी केलेल्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने 250 पार मजल मारली आहे.

PAK vs SL | मोहम्मद रिझवान-इफ्तिखार अहमद जोडीची निर्णायक खेळी, श्रीलंकेला 253 रन्सचं टार्गेट
Follow us
| Updated on: Sep 14, 2023 | 10:23 PM

कोलंबो | पाकिस्तान क्रिकेट टीमने श्रीलंकाला आशिया कप 2023 फायनलमध्ये पोहचण्यासाठी  42 ओव्हरमध्ये 253 धावांचे आव्हान दिले आहे. पाकिस्तानने 42 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 252 धावा केल्या. पाकिस्तानकडून अब्दुल्लाह शफीक याने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. इफ्तिखार अहमद याने 47 रन्स करत मोहम्मद रिझवान याच्यासोबत शतकी भागीदारी केली. तर मोहम्मद रिझवान याने अखेरपर्यंत खिंड लढवत नाबाद 86 धावांची खेळी केली. श्रीलंकाकडून मथीशा पथीराना याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. प्रमोद मधुशन याने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर महीश थेक्षणा आणि दुनिथ वेललागे या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

पाकिस्तानची बॅटिंग

पाकिस्तानला 9 धावांवर पहिला झटका लागला. फखर झमान 4 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर बाबर आझम आणि शफीक या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. दुनिथ वेललागे याने ही जोडी फोडली. दुनिथने बाबरला 29 धावांवर आऊट केलं. त्यानंतर शफीक 52 धावांवर आऊट झाला. शफीक मागोमाग मोहम्मद हरीस 3 रन्स करुन माघारी परतला. हरीसनंतर मोहम्मद नवाझ 12 धावांवर आऊट झाला. त्यामुळे पाकिस्तानची 5 बाद 130 अशी स्थिती झाली.

हे सुद्धा वाचा

पाकिस्तान 250 पार

त्यानंतर इफ्तिखार अहमद आणि मोहम्मद रिझवान या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 84 बॉलमध्ये 108 धावांची शतकी आणि निर्णायक भागीदारी केली. मात्र त्यानंतर इफ्तिखार 40 बॉलमध्ये 47 धावांवर आऊट झाला. इफ्तिखारनंतर शादब खान 3 धावांवर बाद झाला. पण मोहम्मद रिझवान हा (42 ओव्हर dls) शेवटपर्यंत मैदानात राहिला. रिझवानने 73 बॉलमध्ये 86 धावांची नाबाद निर्णायक खेळी केली. तर शाहीन अफ्रिदी 1 धावेवर नाबाद राहिला.

श्रीलंका विरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), फखर झमान, अब्दुल्लाह शफीक, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), मोहम्मद हरिस, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, शाहीन शाह अफ्रीदी आणि जमान खान.

श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शानाका (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, प्रमोद मदुशन आणि मथीशा पाथिराना.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.