Dunith Wellalage च्या फिरकीत Babar Azam फसला, 20 वर्षांच्या पोराने दाखवला बाहेरचा रस्ता
dunith wellalage dismissed babar azam | दुनिथ वेललागे या 20 वर्षांच्या युवा फिरकी गोलंदाजाने टीम इंडियाला घाम फोडला होता. त्यानंतर दुनिथ पाकिस्तान विरुद्ध आरपारच्या लढाईत बाबर आझम याला आपली शिकार केली आहे.
कोलंबो | आशिया कप 2023 फायनलमधील एका जागेसाठी पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका आमनेसामने आहेत. पाकिस्तानने या सामन्यात टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पावसामुळे सामना संध्याकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी सुरु झाला. त्यामुळे या सामन्यातील 5 ओव्हर्स कमी करण्यात आल्या आहेत. यामुळे सामना हा 45 ओव्हरचा होणार आहे. टॉस जिंकून बॅटिंगसाठी पाकिस्तानकडून अबदुल्लाह शफीक आणि फखर झमान सलामी जोडी मैदानात आली. मात्र श्रीलंकेच्या प्रमोद मधुशन याने पाकिस्तानला पहिला झटका दिला.
मधुशन याने फखर झमान याला 4 धावांवर क्लिन बोल्ड करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर कॅप्टन बाबर आझम मैदानात आला. अब्दुल्लाह शफीक आणि बाबर या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशीप केली. या दोघांमध्ये 64 धावांची भागीदारी झाली. त्यामुळे पाकिस्तानला पहिल्या धक्क्यानंतर चांगली सुरुवात मिळाली. ही जोडी सेट झाल्याने श्रीलंका विकेटच्या शोधात होती. श्रीलंकेच्या विकेटचा शोध युवा 20 वर्षीय दुनिथ वेललागे याने संपवला.
दुनिथने आयसीसी रँकिंगमधील नंबर 1 बॅट्समन बाबर आझम याला आऊट केलं. दुनिथने बाबरला आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवून विकेटकीपर कुसल मेंडीस याच्या हाती स्टंपिंग आऊट केलं. दुनिथने टाकलेला बॉल बाबरने हलुच खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र दुनिथने टाकलेल्या बॉलसमोर बाबर गडबडला. बाबरचा दुनिथने टाकलेला बॉल खेळण्याचा प्रयत्न फसला. या प्रयत्नात बाबरचा पाय उठला. विकेटकीपर कुसल मेंडीस याने क्षणाचाही विलंब न लावता बाबरला स्टंपिंग केलं. बाबर अशाप्रकारे आऊट झाला. बाबरने 35 बॉलमध्ये 3 चौकारांसह 29 धावांची खेळी केली.
बाबर आझम दुनिथची शिकार
— No-No-Crix (@Hanji_CricDekho) September 14, 2023
दरम्यान आतापर्यंत आशिया कप 2023 स्पर्धेतील एकूण 3 सामने हे आर प्रेमदासा स्टेडियममध्ये पार पडले आहेत. या तिन्ही सामन्यात पहिले बॅटिंग करणारी टीमच जिंकली आहे. तर या मैदानातील 271 हा एव्हरेज स्कोअर आहे.
श्रीलंका विरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), फखर झमान, अब्दुल्लाह शफीक, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), मोहम्मद हरिस, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, शाहीन शाह अफ्रीदी आणि जमान खान.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शानाका (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, प्रमोद मदुशन आणि मथीशा पाथिराना.