PAK vs SL Live Streaming | पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना टीव्ही आणि मोबाईलवर फुकटात कसा पाहायचा?
PAK vs SL Live Streaming | आशिया कप 2023 सुपर 4 मधील पाचव्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका भिडणार आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरो असा आहे. सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार? जाणून घ्या.
कोलंबो | टीम इंडिया विरुद्ध आशिया कप 2023 फायनलमध्ये कोणती टीम खेळणार, याचा निकाल गुरुवारी 14 सप्टेंबरला लागणार आहे. आशिया कप 2023 सुपर 4 फेरीतील सामन्यात पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका आमनेसामने भिडणार आहेत. या सामन्यात जिंकणारी टीम अंतिम फेरीत पोहचेल. टीम इंडियाने 12 सप्टेंबरला श्रीलंकेला पराभूत करत आधीच फायनलचं तिकीट बूक केलं आहे. टीम इंडियाच्या या विजयामुळे बांगलादेश सुपर 4 मधून बाहेर पडली. त्यामुळे आता फायनलमधील एका जागेसाठी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात रंगत पाहायला मिळणार आहे. हा सामना टीव्ही आणि मोबाईलवर फुकटात कुठे पाहता येणार हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना केव्हा?
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामना हा गुरुवारी 14 सप्टेंबरला पार पडणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका कोणत्या स्टेडियममध्ये?
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सुपर 4 मधील पाचवा सामना हा कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये पार पडणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरु होईल. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना मोबाईलवर फ्री कुठे पाहायला मिळणार?
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना मोबाईलवर हॉटस्टार या अॅपद्वारे फ्री पाहता येईल.
श्रीलंका विरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद हरिस, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, शाहीन शाह अफ्रीदी आणि जमान खान.
आशिया कपसाठी श्रीलंका क्रिकेट टीम | दासुन शनाका (कॅप्टन), कुसल मेंडिस (उपकर्णधार), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल जेनिथ परेरा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, सदीरा समरविक्रमा, महेश थिक्षाना, दुनिथ वेललागे, मथीशा पाथिराना, कसून राजिथा, दुशन हेमंथा, बिनुरा फर्नांडो आणि प्रमोद मधुशन.