Ayesha Naseem Retirement | आयशा नसीम हीची वयाच्या 18 व्या वर्षी निवृत्तीची घोषणा, धर्मासाठी क्रिकेटची ‘विकेट’

Cricket Retirement News | या क्रिकेटरने घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे. या क्रिकेटरने असा निर्णय का घेतला, अशी चर्चा रंगली आहे.

Ayesha Naseem Retirement | आयशा नसीम हीची वयाच्या 18 व्या वर्षी निवृत्तीची घोषणा, धर्मासाठी क्रिकेटची 'विकेट'
भारतामध्ये यंदाच्या क्रिकेट वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे. वर्ल्ड कपचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियामध्ये पार पडणार आहे. तिकीटांची खरेदी झाली असून आता मोठी तारांबळ उडताना दिसणार आहे.
Follow us
| Updated on: Jul 20, 2023 | 7:09 PM

इस्लामाबाद | क्रिकेट विश्वातून अतिशय मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्या वयापासून खऱ्या अर्थाने आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी नेट्समध्ये घाम गाळला जातो, विविध स्पर्धेतून चमकदार कामगिरी करत निवड समितीचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातो, त्या वयात एका क्रिकेटरच्या निर्णयामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. या खेळाडूने घेतलेल्या निर्णयामुळे असं का केलं असावं, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. युवा खेळाडूने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली आहे.

पाकिस्तानची युवा अष्टपैलू आयेशा नसीम हीने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. आयेशाने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात पीसीबीला निवृत्तीची माहिती दिली आहे. आयेशाने निवृत्तीचं कारणही स्पष्ट केलंय.

आयेशा नसीम निवृत्त

आयेशा काय म्हणाली?

आयेशाने निवृत्ती घेण्याचं कारण सांगितलंय. “मी क्रिकेट सोडतेय. मला इस्लाम धर्मानुसार उर्वरित आयुष्य जगायचंय”, असं स्पष्टीकरण आयेशाने दिलंय.

आयेशा नसीम हीची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द

आयेशा नसीम हीने पाकिस्तानचं 4 एकदिवसीय आणि 30 टी 20 सामन्यात प्रतिनिधित्व केलंय. आयेशाने वनडेत 33 आणि टी 20 मध्ये 369 अशा एकूण 402 आंतराराष्ट्रीय धावा केल्या आहेत. आयेशाने 12 जुलै 2021 रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध एकदिवसीय पदार्पण केलं होतं. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध 23 जानेवारी 2023 रोजी खेळलेली वनडे मॅच ही तिच्या एकदिवसीय कारकीर्दीतील अखेरची ठरली.

तर त्याआधी 3 मार्च 2020 रोजी विंडिज विरुद्धच टी 20 डेब्यू केलं होतं. तर आयेशाने आयर्लंड विरुद्ध 15 फेब्रुवारी 2023 ला खेळलेला टी 20 सामना हा अखेरचाच ठरला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.