Asia Cup 2023 | आशिया कप 2023 स्पर्धेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा
Pakistan Squad For Asia Cup 2023 | आशिया कप 2023 स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट टीमने 17 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. टीममध्ये 2 वर्षांनंतर अष्टपैलू खेळाडूंच कमबॅक झालयं.
मुंबई | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आगामी आशिया कप 2023 स्पर्धेसाठी आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी पीसीबीने पाकिस्तान क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. पीसीबीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. आशिया कपआधी पाकिस्तान अफगाणिस्तान विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी पीसीबीने 18 खेळाडूंचा टीममध्ये समावेश केला आहे. तर आशिया कपसाठी 17 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. बाबर आझम पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर टीममध्ये तब्बल 2 वर्षांनंतर फहीम अश्रफ याचं कमबॅक झालं आहे.
आशिया कप 2023 स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. आशिया कपमधील सलामीचा सामना हा पाकिस्तान विरुद्ध नेपाळ यांच्यात होणार आहे. आशिया कपआधी पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे. दुसरी मॅच 24 ऑगस्टला होईल. तर 26 ऑगस्टला तिसरा आणि अंतिम सामना होणार आहे.
अफगाणिस्तानने या वनडे सीरिजसाठी 3 दिवसांआधीच 6 ऑगस्टला 18 सदस्यीय संघाची घोषणा केली. हश्मतुल्लाह शाहिदी अफगाणिस्तानचं कर्णधारपद सांभाळणार आहे.
वनडे सीरिजसाठी अफगाणिस्तान टीम | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज, इक्रम अलीखिल, इब्राहिम जद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, नूर अहमद, मुजीब उर रहमान, फजल हक फारुकी, अब्दुल रहमान, मोहम्मद सलीम सफी आणि वफादर मोमंद.
रिझर्व्ह प्लेअर | फरीद अहमद आणि शाहिदुल्लाह कमाल.
आशिया कप आणि अफगाणिस्तान मालिकेसाठी पाकिस्तान टीम
? Our squad for the Afghanistan series and Asia Cup ?
Read more: https://t.co/XtjcVAmDV7#AFGvPAK | #AsiaCup2023 pic.twitter.com/glpVWF6oWW
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 9, 2023
आशिया कप आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तान टीम | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तय्यब ताहिर, सौद शकील (फक्त अफगाणिस्तान मालिकेसाठी), मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदी.