T20I World Cup 2024 स्पर्धेसाठी पाकिस्तान संघ जाहीर, या घातक गोलंदाजाला संधी
Pakistan Icc T20I World Cup Squad 2024: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अखेर सर्वात शेवटी आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी संघ जाहीर केला आहे.
आगामी आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागून राहिली आहे. या स्पर्धेला 2 जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. त्यापैकी 19 संघांनी आपल्या पथकाची घोषणा केली. त्यांनतर आता सर्वात शेवटी टीम इंडियाची कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान क्रिकेट टीमने वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर केला आहे. आयसीसी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. बाबर आझम हा पाकिस्तानचं टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत नेतृत्व करणार आहे.
वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर करण्याच्या 25 मे या अखेरच्या तारखेच्या पूर्वसंध्येला पाकिस्तानने टीमची घोषणा केली. बाबर आझमच्या नेतृत्वात वर्ल्ड कप संघात 5 गोलंदाज, 3 विकेटकीपर आणि 4 ऑलराउंडरचा समावेश करण्यात आला आहे. तर पाकिस्तानने राखीव खेळाडूंची नावं अद्याप जाहीर केलेली नाहीत. पाकिस्तान आपल्या वर्ल्ड कप स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात 6 जून रोजी अमेरिके विरुद्ध करणार आहे. त्यानंतर पाकिस्तान वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा सामना हा 9 जून रोजी कट्टर प्रतिस्पर्धी टीम इंडिया विरुद्ध खेळणार आहे. पाकिस्तान ए ग्रुपमध्ये आहे. या ए ग्रुपमध्ये टीम इंडिया, कॅनडा, आयर्लंड आणि यूएसएचाही समावेश आहे.
पीसीबीने वर्ल्ड कप टीममध्ये निवृत्ती घेतलेल्या 2 खेळाडूंचा समावेश केला आहे. इमाद वसीम याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच आणि मॅच फिक्सिंगचे आरोप असलेला आणि निवृत्ती घेतलेल्या. मोहम्मद आमिर यालाही संधी दिली आहे. मोहम्मद आमिर 2010 च्या इंग्लंड दौऱ्यात स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी सापडला होता. मात्र यानंतर आयसीसीने मुदतीपूर्वीच आमिरला दोषमुक्त केलं. मोहम्मद आमिर आणि इमाद वसी हे दोघे अनुक्रमे 2016 आणि 2019 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळले होते. अबरार अहमद, आजम खान, मोहम्मद अब्बास अफ्रिदी, सईम अय्युब आणि उस्मान खान या 5 जणांची वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची पहिली वेळ असणार आहे.
टी 20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान संघ जाहीर
Pakistan announce their squad for the ICC Men’s #T20WorldCup 2024 👀https://t.co/2G2zc8mnyB
— ICC (@ICC) May 24, 2024
टी 20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान टीम : बाबर आजम (कप्तान), अबरार अहमद, आजम खान, फखर जमान, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास अफरीदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, सईम अयूब, शादाब खान, शाहीन शाह अफरीदी। उस्मान खान