पाकिस्तानच्या बाबर आझमचा ‘वेगवान’ रेकॉर्ड; विराट कोहली, हाशिम आमलाला टाकलं मागे!

बाबर आझमने (Babar Azam) खास शतकी खेळीदरम्यान बाबरने विराट कोहली (Virat Kohli) आणि हाशिम अमलाचा (Hashim Amla) विक्रम मोडला. 

पाकिस्तानच्या बाबर आझमचा 'वेगवान' रेकॉर्ड; विराट कोहली, हाशिम आमलाला टाकलं मागे!
बाबर आझम
Follow us
| Updated on: Apr 03, 2021 | 7:27 AM

मुंबईपाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Pakistan vs South Africa) यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या (Pak vs SA ODI Series) मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना सेंच्युरियन येथे खेळवला गेला. या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेवर तीन गडी राखून विजय मिळविला. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) शानदार शतक ठोकले. त्याच्या खास शतकी खेळीदरम्यान बाबरने विराट कोहली (Virat Kohli) आणि हाशिम अमलाचा (Hashim Amla) विक्रम मोडला.  (Pakistan babar Azam break Virat kohli And hashim Amla Record Pak vs SA ODI Match)

बाबर आझमची वेगवान 13 शतकं

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या 274 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने 103 धावांची शानदार खेळी केली.बाबरने या शतकासह वेगवान 13 शतके करण्याचा विक्रम केला आहे. त्याच्या आधी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हाशिम अमलाच्या नावावर होता. त्याने 83 डावात हा पराक्रम केला होता. हा पराक्रम पूर्ण करण्यासाठी बाबरने अवघ्या 76 डावांचा सामना केला. दुसरीकडे विराट कोहलीने 86 डावांमध्ये 13 शतके ठोकली आहेत.

बाबर आझमचा वेगवान रेकॉर्ड, पाकिस्तानने मॅचही जिंकली

या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेसाठी वेन डेर ड्यूसेनने 123 धावांची खेळी केली. याशिवाय डेव्हिड मिलरनेही 50 धावा केल्या. ज्याच्या बळावरदक्षिण आफ्रिकेने 6 गडी गमावून 273 धावा केल्या.

प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचे शतक आणि इमाम उल हकच्या 70 धावांनी पाकिस्तानने शेवटच्या बॉलवर हा सामना 3 गडी राखून जिंकला. दक्षिण आफ्रिकेसाठी, एनिच नॉर्ट्जेने शानदार चार गडी बाद केले, पण त्याचा फायदा त्याच्या संघाला होऊ शकला नाही.

या विजयासह पाकिस्तानने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर पाकिस्तानच्या संघाला 3 एकदिवसीय सामने आणि 4 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत.

(Pakistan babar Azam break Virat kohli And hashim Amla Record Pak vs SA ODI Match)

हे ही वाचा :

IPL 2021 : हे 5 खेळाडू RCB चं नशीब पलटवू शकतात, संपवू शकतात जेतेपदाचा दुष्काळ!

Sachin Tendulkar : पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूची सचिनसाठी प्रार्थना, म्हणाला, ‘सचिन कोरोनालाही सीमेपार पाठवेल”

विराट कोहलीला संताप अनावर, 23 वर्षीय फलंदाजाला भर मैदानात धमकी

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.