Video : पाकिस्तानच्या फलंदाज बाबर आझमची अजब गजब प्रॅक्टिस, बॅटऐवजी..
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात 7 ऑक्टोबरपासून मुल्तानमध्ये कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या खेळाडूंनी सराव केला. पण बाबर आझमचा सराव पाहून ट्रोलर्सने ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तर पाकिस्तानी क्रिकेटचे चाहतेची बचावासाठी पुढे सरसावले.
बांगलादेशविरुद्ध कसोटी सामन्यात 2-0 ने मात खाल्यानंतर पाकिस्तानचा पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. पाकिस्तानसमोर आता इंग्लंडचं आव्हान असणार आहे. तीन सामन्यांची कसोटी मालिका असून पहिला सामना मुल्तानमध्ये खेळला जाणार आहे. पहिला सामना 7 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या बाबर आझमचा सरावाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत बाबर आझम बॅटऐवजी फक्त कव्हरने प्रॅक्टिस करताना दिसत आहे. तर विकेटमागे मोहम्मद रिझवान विकेटकीपिंग करताना दिसत आहे. अशा विचित्र पद्धतीने प्रॅक्टिस करताना पाहून ट्रोलर्सने ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे, पाकिस्तानी चाहते आपल्या खेळाडूंच्या बचावासाठी पुढे सरसावले. पण नेमकं असं काय झालं त्याबाबत जाणून घेऊयात. बाबर आझमने बॅट न घेता कव्हरने प्रॅक्टिस करण्याची गरज काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. ट्रोलर्सने ट्रोल करताना लिहिलं की, अशा पद्धतीचा सराव फक्त पाकिस्तानातच होऊ शकतो. एका ट्रोलर्सने लिहिलं की, बाबर आझम चेंडू न मारण्यासाठी असा सराव करत आहे.
पाकिस्तानी चाहतेही आपल्या खेळाडूंच्या बचावासाठी पुढे सरसावले. हा सराव बाबर आझमसाठी नाही तर मोहम्मद रिझवानसाठी आहे. तो फिरकीपटू टाकत असलेल्या चेंडूवर कटचा अभ्यास करत आहे. फिरकी विरुद्ध काठावर कट लागणाऱ्या चेंडूचा सराव अशा प्रकारे केला जातो. याबाबत अनेक व्हिडीओ इंटरनेटवर उपलब्ध आहेत.
Only Pakistan could come up with practices like these. 🤣 pic.twitter.com/Sj9gmfCUYg
— Vipin Tiwari (@Vipintiwari952) October 5, 2024
Seems u don’t know about real cricket . Just a watcher. That’s the keeper practice to catch the edges.. baber is the distraction..
— abdul ahad (@AAhad83) October 5, 2024
पाकिस्तान क्रिकेट संघ गेल्या अडीच वर्षात घरच्या मैदानावर एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. नुकतंच बांगलादेशने पाकिस्तानला 2-0 ने पराभूत करत व्हाईट वॉश दिला होता. आता इंग्लंडला कसोटीत पराभूत करून हे पराभवाची मालिका तोडण्याची संधी आहे. पाकिस्तानसाठी दिलासादायक बातमी म्हणजे, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स खेळणार नाही. त्याच्या जागी ओली पोप संघाचं नेतृत्व करणार आहे. मागच्या वेळी स्टोक्सच्या नेतृत्वात इंग्लंडने पाकिस्तानचा 3-0 ने पराभव केला होता.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): सइम अयुब, अब्दुल्ला शफीक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ब्रायडन कार्स, जॅक लीच, शोएब बशीर.