Video : पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी घालावी लागतात फाटलेली बूट, कारण…

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी त्याच्या गोलंदाजीमुळे चर्चेत असतो. मात्र यावेळी त्याच्या फाटक्या बुटांनी सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. शाहीन सध्या टी20 ब्लास्टमध्ये खेळत असून नॉटिंघमशर संघाचा भाग आहे.

Video : पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी घालावी लागतात फाटलेली बूट, कारण...
Video : शाहीन शाह आफ्रिदीला फाटलेले बूट का? जाणून घ्या काय म्हणाला तोImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 19, 2023 | 6:24 PM

मुंबई : पाकिस्तान हा देश सध्या आर्थिक दिवाळखोरीत आहेत. देशावर कर्जाचा डोंगर असून महागाईने सामान्य जनता त्रस्त आहे. त्यात आता पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याच्या फाटक्या बुटांची चर्चा रंगली आहे. त्याच्या फाटक्या बुटांनी क्रीडाप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे गोलंदाजी करताना फाटलेले बुट घालतो की त्यामागे दुसरं काही कारण आहे, याची उत्सुकता लागून आहे. संभ्रमावस्था असताना शाहीन आफ्रिदीने फाटलेल्या बुटाबाबत खुलासा केला आहे. पाकिस्तानला पुढची सिरीज श्रीलंकेविरुद्ध खेळायची आहे. या मालिकेपूर्वी पाकिस्तानचा वेगवान गोलंदान शाहीन शाह आफ्रिदी इंग्लंडमध्ये आहे. टी20 ब्लास्टमध्ये शाहीन सध्या खेळत आहे. या दरम्यान त्याने फाटक्या बुटांबाबत खुलासा केला आहे.

शाहीन शाह आफ्रिदीच्या पायाजवळ कॅमेरा जाताच त्याच्या अंगठ्याजवळ एक मोठा होल दिसून आला. तेव्हा त्याला याबाबत प्रश्न विचारला गेला. तुझे बुट फाटले आहेत का? की असं जाणूनबुजून केलं आहेस? यावर त्याने खुलासा करत सांगितलं की, या बुटांना स्वत:च होल केला आहे.

शाहीनने स्वत:च बुटांना होल केल्याचं समजताच त्यामागे नेमकं कारण काय? असा दुसरा प्रश्न विचारला गेला. तेव्हा शाहीनने सांगितलं की, यामुळे मला आराम मिळतो. खासकरून जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा याचा जास्त उपयोग होतो. बुटाला पुढे होल पाडल्याने गोलंदाजी करण्यास मदत होते.

शाहीन शाह आफ्रिदीची उंची खूप आहे. लांबलचक शरीरयष्टीमुळे त्याच्या पायाची साईजही जास्त आहे. शाहीन आफ्रिदीने सांगितलं की, तो युके साईजमध्ये 12 नंबरचे बुट घालतो. वेगवाने गोलंदाज अनेकदा गोलंदाजी रताना बुटाचा पुढचा भागाला होल पाडतात. कारण फॉलोथ्रूमध्ये अंगठा बुटांना लागू नये हा त्यामागचा हेतू असतो.

शाहीन शाह आफ्रिदी दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर होता. त्याने आपली शेवटचटी कसोटी मागच्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध खेळली होती. जखमी अवस्थेतून सावरण्यासाठी त्याला 1 वर्षाचा अवधी लागला. 23 वर्षीय शाहीन शाह आफ्रिदीने 25 कसोटीत 99, वनडेत 70, टी20 मध्ये 64 गडी बाद केले आहेत. सध्या शाहीन टी20 ब्लास्टमध्ये खेळत आहे. आता श्रीलंकेविरुद्धच्या पाकिस्तान संघात त्याची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.