World Cup 2023 | वर्ल्ड कपआधी टीमला झटका, स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा
Cricket Retirement | वर्ल्ड कपच्या तोंडावर स्टार गोलंदाजने एकाएकी निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे टीमला मोठा झटका लागला आहे.
मुंबई | आशिया कप स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालंय. बहुप्रतिक्षित आशिया कप स्पर्धेला 15 दिवसांपेक्षा कमी दिवस बाकी आहेत. ऑगस्ट महिन्यातील 30 तारखेपासून या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ या 6 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी लढत होणार आहे. नेपाळने यंदा पहिल्यांदाच आशिया कपसाठी क्वालिफाय केलं आहे. त्यामुळे यंदा क्रिकेट चाहत्यांना आणखी थरार अनुभवता येणार आहे.
आशिया कपमधील एकूण 13 सामन्यांचं आयोजन पाकिस्तान आणि श्रीलंका इथे करण्यात आलं आहे. या 13 पैकी 9 सामने श्रीलंका आणि 4 मॅच पाकिस्तानमध्ये पार पडणार आहेत. या स्पर्धेच्या आधी पाकिस्तान क्रिकेट टीमला मोठा झटका लागला आहे. पाकिस्तान क्रिकेट टीमच्या स्टार आणि अनुभवी गोलंदाजाने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. क्रिकेटरने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वहाब रियाझ याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. वहाने सोशल मीडियाद्वारे निवृत्तीची माहिती दिली.
ट्विटमध्ये काय म्हटलंय?
🚨 A Pakistan veteran has called time on his international career.
More 👇https://t.co/HXNLhxbKo4
— ICC (@ICC) August 16, 2023
मी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय. इथपर्यंतचा प्रवास हा फार महत्वाचा राहिला. वहाबने पीसीबी कोच, सहकारी,कुटुंबिय आणि क्रिकेट चाहत्यांचे इथवर दिलेल्या समर्थनासाठी जाहीर आभार मानले. निवृत्ती घेतली असली तरी वहाब हा जगभरातील लीग क्रिकेटमध्ये खेळणार आहे.
वहाब रियाज याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द
वहाब रियाज याने पाकिस्तानचं 27 कसोटी, 91 वनडे आणि 36 टी 20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. रियाजने कसोटीत 83, वनडेत 120 आणि टी 20आयमध्ये 34 विकेट्स घेतल्या आहेत.
आशिया कपसाठी पाकिस्तान क्रिकेट टीम
बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तय्यब ताहिर, सौद शकील (फक्त अफगाणिस्तान मालिकेसाठी), मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदी.