Pakistan Cricket : 1 कॅप्टन 2 दौरे 4 मालिका आणि तब्बल इतके खेळाडू, पाकिस्तान संघ जाहीर

Pakistan Squad For Australia And Zimbabwe Tour : मायदेशात 3 वर्षानंतर कसोटी मालिका जिंकल्यानंतर आता पाकिस्तान 2 दौरे करणार आहे. पाकिस्तान या दोन्ही दौऱ्यांमध्ये एकदिवसीय आणि टी 20i मालिका खेळणार आहे. या दोन्ही दौऱ्यांसाठी पाकिस्तानने संघ जाहीर केला आहे.

Pakistan Cricket : 1 कॅप्टन 2 दौरे 4 मालिका आणि तब्बल इतके खेळाडू, पाकिस्तान संघ जाहीर
pakistan cricket national anthemImage Credit source: babar azam X Account
Follow us
| Updated on: Oct 27, 2024 | 8:28 PM

पाकिस्तानने इंग्लंडला 2-1 ने लोळवत 3 वर्षानंतर मायदेशात मालिका जिंकली. पाकिस्तान आता ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर झिंबाब्वे दौरा करणार आहे. पाकिस्तान या दोन्ही दौऱ्यात वनडे आणि टी 20i सीरिज खेळणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या दोन्ही दौऱ्यांसाठी 27 ऑक्टोबरला संघ जाहीर केला आहे. या दोन्ही दौऱ्यांसाठी पीसीबीने अनेक युवा खेळाडूंसह नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. तर संघ जाहीर केल्यानंतर काही तासांनी पूर्णवेळ कर्णधाराची घोषणा केली. बाबर आझम याने टी 20 वर्ल्ड कपमधील कामगिरीची जबाबदारी स्वीकारत कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून वनडे आणि टी 20i संघाचं कर्णधारपद रिक्त होतं.

शाहीन आणि बाबरचं कमबॅक

निवड समितीने ऑस्ट्रेलिया आणि झिंबाब्वे दौऱ्यासाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे आणि टी 20i सीरिजमध्ये बाबर आझम, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी यांचा समावेश करण्यात आला आहे. या तिघांना इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यातून डच्चू देण्यात आला होता. मात्र या तिघांना झिंबाब्वे दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी आमिर जमाल, अराफात मिन्हास, फैझल अक्रम, हसीबुल्लाह, मुहम्मद इरफान खान आणि सॅम अयुब यांना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. तर जहानदाद खान आणि सलमान अली आगाह यांची पहिल्यांदाच टी 20i संघात निवड करण्याच आली आहे. तर मोहम्मद हसैनन याचं अनेक महिन्यांनी कमबॅक झालं आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक

एकदिवसीय मालिका

पहिला सामना, सोमवार 4 नोव्हेंबर, मेलबर्न

दुसरा सामना, शुक्रवार 8 नोव्हेंबर, एडलेड

तिसरा सामना, रविवार 10 नोव्हेंबर, पर्थ

टी 20i सीरिज

पहिला सामना, गुरुवार 14 नोव्हेंबर, ब्रिस्बेन

दुसरा सामना, शनिवार 16 नोव्हेंबर, सिडनी

तिसरा सामना, 18 नोव्हेंबर, होबार्ट

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पाकिस्तान टीम

एकदिवसीय संघ : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अराफात मिन्हास, बाबर आजम, फैसल अकरम, हारिस रऊफ, हसीबुल्लाह (विकेटकीपर), कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, मुहम्मद इरफान खान, नसीम शाह, सईम अयूब, सलमान अली आगा आणि शाहीन शाह अफरीदी.

टी20 टीम : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), अराफात मिन्हास, बाबर आजम, हारिस रऊफ, हसीबुल्लाह, जहांदाद खान, मोहम्मद अब्बास अफरीदी,मोहम्मद इरफान खान, नसीम शाह, ओमैर बिन यूसुफ, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा, शाहीन शाह अफरीदी, सुफियान मोकीम, उस्मान खान.

झिंबाब्वे दौऱ्याचं वेळापत्रक

एकदिवसीय मालिका

पहिला सामना, रविवार 24 नोव्हेंबर, बुलावायो

दुसरा सामना, मंगळवार 26 नोव्हेंबर, बुलावायो

तिसरा सामना, गुरुवार 28 नोव्हेंबर, बुलावायो

टी 20i सीरिज

पहिला सामना, रविवार 1 डिसेंबर, बुलावायो

दुसरा सामना, मंगळवार 3 डिसेंबर, बुलावायो

तिसरा सामना, गुरुवार 5 डिसेंबर, बुलावायो

झिंबाब्वे दौऱ्यासाठी पाकिस्तान टीम

वनडे टीम : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, अहमद दानियाल, फैसल अकरम, हारिस रऊफ, हसीबुल्लाह (विकेटकीपर), कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, मुहम्मद इरफान खान, सईम अयूब, सलमान अली आगा, शाहनवाज दहानी और तय्यब ताहिर.

टी20i सीरिजसाठी टीम : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), अहमद दानियाल, अराफात मिन्हास, हारिस रऊफ, हसीबुल्लाह (विकेटकीपर), जहांदाद खान, मोहम्मद अब्बास अफरीदी, मोहम्मद हसनैन, मुहम्मद इरफान खान, ओमैर बिन यूसुफ, कासिम अकरम, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा, सुफयान मोकिम, तय्यब ताहिर आणि उस्मान खान.

ऑस्ट्रेलिया आणि झिंबाब्वे दौऱ्यासाठी पाकिस्तान टीम

दरम्यान पीसीबीने संघ जाहीर केल्यानंतर काही तासांनी पूर्णवेळ कर्णधाराचं नाव जाहीर केलं. मोहम्मद रिझवान हा पाकिस्तानचा वनडे आणि टी 20i कॅप्टन असणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि झिंबाब्वे दौऱ्यात मोहम्मद रिझवान नेतृत्व करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.