आयपीएल गोत्यात आणण्यासाठी पाकिस्तानची मोठी खेळी, आता रचला असा प्लान

आयपीएल स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होणार असून यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचे वेध संपूर्ण जगाला लागले आहेत. जगातील श्रीमंत लीगपैक एक आहे. असं असताना शेजारी असलेल्या पाकिस्तानला याची पोटदुखी होणार यात शंकाच नाही. त्यामुळे त्याने आयपीएलमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

आयपीएल गोत्यात आणण्यासाठी पाकिस्तानची मोठी खेळी, आता रचला असा प्लान
Follow us
| Updated on: Mar 14, 2024 | 9:02 PM

मुंबई : आयपीएल स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होणार असून पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. या स्पर्धेसाठी देशभरातील चांगल्या खेळाडूंची लिलावाद्वारे निवड झाली आहे. एकूण दहा संघांनी कोट्यवधी रुपयांची बोली लावून खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेतलं आहे. मात्र पाकिस्तानला या स्पर्धेपासून गेल्या अनेक वर्षांपासून दूर ठेवण्यात आलं आहे. दहशतवादाला खतपणी घालणं आणि आश्रय देण्यात पाकिस्तानने कायम पुढाकार घेतला आहे. तसेच वारंवार दहशतवादी कारवाया करूनही त्याकडे कानाडोळा करत असल्याचं दिसून आलं आहे. यामुळे भारताने पाकिस्तानसोबत सर्व संबंध तोडून टाकले आहेत. आयसीसी चषक वगळता भारतीय संघ पाकिस्तानसोबत सामना खेळत नाही. त्यामुळे पाकिस्तानची चांगलीच गोची झाली आहे. इतकंच काय तर जगातील अनेक देशांनी पाकिस्तानला ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं आहे. त्याचबरोबर पैशांसाठी हातात वाडगा घेऊन भीक मागण्याची वेळ आहे. अशी एकंदरीत सर्व परिस्थिती असताना सूळ पेटला तरी वळ काही जात नाही असंच दिसत आहे. आता आयपीएलमध्ये खोडा घालण्याचा पाकिस्तानचा डाव आहे.

आयपीएल स्पर्धा मे महिन्याच्या अखेरपर्यंत असणार आहे. पण पाकिस्तानने या स्पर्धेदरमन्यात न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. 18 एप्रिलपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. आयपीएल दरम्यान पाकिस्तानने हे वेळापत्रक जाहीर केल्याने टीका होत आहे. आयपीएल 2024 स्पर्धेत न्यूझीलंडचे 8 खेळाडू आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचा भागही आहेत. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धची मालिका खेळण्यासाठी आयपीएल मध्यातच सोडणार की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे.

आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना खेळण्याची परवानगी नाही. त्यामुळे बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला वेळापत्रक बदलण्याचा सल्ला दिलेला नाही. दुसरीकडे, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने तशी विनंती केली तरी पाकिस्तान तारीख बदलेल असं वाटत नाही. त्यामुळे न्यूझीलंडला एकतर दुसऱ्या फळीतील संघ पाकिस्तानला पाठवावा लागेल. तसं नसेल तर 8 खेळाडूंना मध्यातच आयपीएल सोडून संघासाठी खेळावं लागेल.

न्यूझीलंडचे सर्वाधिक खेळाडू हे चेन्नई सुपर किंग्स संघात आहेत. यात डेव्हॉन कॉनवे, डॅरिल मिशेल, रचिन रविंद्र, मिचेल सँटनर यांचा चेन्नईचा संघात समावेश आहे. तर केन विल्यमसन गुजरात टायटन्स, लॉकि फर्ग्युसन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, ट्रेंट बोल्ट राजस्थान रॉयल्स आणि ग्लेन फिलिप्स सनरायझर्स हैदराबाद या संघात आहेत.

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड पहिला टी20 सामना 18 एप्रिल, दुसरा टी20 सामना 20 एप्रिल, तिसरा टी20 सामना 21 एप्रिलला, चौथा टी20 सामना 25 एप्रिल आणि पाचवा टी20 सामना 27 एप्रिलला होणार आहे. भारतीय वेळेनुसार हे सामने संध्याकाळी 7 वाजता असणार आहेत.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.